शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीचा अर्जून ठाकूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:15 IST

शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ८३.५४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला. त्याने ९९.२० टक्के (४९६) गुण घेतले.सुशील हिंमतसिंगका विद्यालयाचा क्षितीज गौतम भस्मे हा ९९ टक्के गुण घेवून दुसºया क्रमांकावर राहिला. त्याने ४९५ गुण घेतले. जिल्ह्यातून तिसरा येण्याचा मान आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूल शाळेच्या साक्षी हरिष वडाळकर हिने पटकाविला. तिने ९८.८० टक्के (४९४) गुण घेतले. शिवाय ती जिल्ह्यातून मुलींमधून पहिली ठरली. अग्रगामी हायस्कूल पिपरी (मेघे) येथील अनुजा साटोने ही ९७.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात मुलींमधून दुसरी ठरली.जिल्ह्यातील निकालात मुलींची टक्केवारी ८८.३१ एवढी आहे तर ७९.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात यंदाच्या वर्षाला ८३.५४ टक्के निकाल लागला.जिल्ह्यातील २७९ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतून एकूण १७ हजार ८९१ मुलांनी परीक्षेचा अर्ज भरला. यात ९ हजार ३६६ मुले आणि ८ हजार ५२५ मुलींचा समावेश आहे. यातील १७ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांपैकी १४ हजार ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांत ७ हजार ३८५ मुले आणि ७ हजार ८०५ मुलींचा समावेश आहे.एका शाळेचा निकाल शुन्य टक्केजिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचा निकाल शुन्य टक्के लागला. तर भरत दिनांत विद्यालयाचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी राहिला. त्याची टक्केवारी १२.५० टक्के एवढी राहिली आहे. 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८