शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी शहरावर कृत्रिम पाणी टंचाईचे सावट; गृहिणींची झाली फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा(आर्वी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात होणारा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून ठप्प झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे भर उन्हाळ्यात हाल होत असून, नळाला दोन दिवसांपासून पाणी नसल्याने गृहिणींची पाण्यासाठी चांगलीच फजिती होत असल्याचे चित्र आहे.आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो.शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे. उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता किंवा इतर कर्मचारी नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोषाचे  वातावरण निर्माण झाले आहे. आधीच रणरणत्या उन्हामुळे घाम फुटू लागला आहे. त्यातच पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे.

सहा वॉर्डात पाणीटंचाईचे चटके-  या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना, तो आमचा प्रश्न नाही, असे म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. -  अनेक वॉर्डात सार्वजनिक नळ व  नागरिकांच्या  घरात नळाला तोट्या नाहीत. -  पाण्याचा अपव्यय होत असताना, दुसरीकडे हमालपुरा, जनतानगर, संजयनगर, साईनगर, वाल्मिक वॉर्ड,   मायबाई वॉर्ड येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

कायमस्वरुपी मुख्याधिकारी हवा...-  शहराची लोकसंख्या ४५ हजारांवर असताना केवळ एकच टँकर आहे. यामुळे पाणीटंचाई भागात नागरिकांना पाणी मिळत नाही. -  कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी सीईओसाहेबांना सांगा, असे सांगून वेळ मारतात. -   देवळीकर यांच्याकडे न.प.चा प्रभार असून, प्रशासकीय अधिकारीही लक्ष देत नसल्याची ओरड आहे.

देऊरवाड़ा  पंप हाऊसमध्ये यांत्रिकी बिघाडामुळे मजीप्रकडून शहराला पाणी पुरवठा झाला नाही. दुरुस्तीचे काम सुरू असून, पाण्याचा वापर जपून करावा, नागरिकांनी सहकार्य करावे.  - प्रशांत मूल, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, मजीप्रा.

शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी न.प.च्या टँकरने हमालपुरा व जनतानगर येथे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.- सुनील आरिकर, आरोग्य निरीक्षक, न.प.

दोन दिवसांपासून नळाला पाणी नाही. याबाबत पूर्वसूचनाही दिली नाही. त्यामुळे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. एकमेव नळाच्या भरवशावर आमचे काम आहे. दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी भरावे लागते आहे.- संजय जगताप, नागरिक, जाजूवाडी

 

टॅग्स :water shortageपाणीकपात