शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

दोन दिवसांत साडेपाच हजार क्विंटल धान्याची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून सुरु झालेल्या नियोजनबद्ध धान्य विक्रीला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्येही शेतकऱ्यांना आधार : सोशल डिस्टंन्सिंगचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सर्वत्र लॉकडाऊन असतानाही राज्यातील नामांकित हिंगणघाटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक चांगलीच वाढली आहे. दोन दिवसात या बाजार समितीत १८० वाहनांच्या माध्यमातून तब्बल ५ हजार ७०० क्विंटल धान्याची आवक झाली आहे. शेतकऱ्यांच्या आरोग्याकरिता येथे निर्जंतुकीकरण व सोशल डिस्टन्सिगचेही काटेकोरपणे पालन केले जात आहे.देशात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. अशा स्थितीत अन्नधान्याचा तुटवडा पडू नये. शेतकऱ्यांची आर्थिक परवड दूर व्हावी म्हणून सुरु झालेल्या नियोजनबद्ध धान्य विक्रीला शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात बुधवारी ८२ वाहनांमधून १ हजार ८७५ क्विंटल तर शुक्रवारी ९८ वाहनांमधून ३ हजार ९०० क्विंटल धान्याची आवक झाली. गुरुवारी रामजन्मोत्सवानिमित्त धान्य बाजार बंद होता. धान्य बाजारातील गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळला जावा म्हणून शेतमालाची आवक मर्यादित करून दररोज १०० वाहनांना प्रवेश दिला जातो. शेतकऱ्यांना बाजार समितीत संपर्क साधून आपल्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतर त्यांना मिळालेल्या तारखेवरच त्यांचा शेतमाल घेण्यात येत आहे.त्यानुसार प्रवेशद्वारावरच मास्क लावलेल्या शेतकऱ्यांचे सॅनिटेशन करुनच आत प्रवेश दिला जातो. वजन काट्यावर हमाल, मापारी यांची संख्या तीन ठेवली आहे. गर्दी होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक व कर्मचारी ठिक ठिकाणी नियुक्त केले आहे. कॅन्टीनमधील जेवण व्यवस्था पॉकेट मधून केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपकावरून सूचना देत हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच रोज सायंकाळी मार्केट यार्डचे निर्जंतुकीकरण करण्याची काळजी बाजार समिती व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे.अद्याप २० टक्के कापूस शेतकऱ्यांकडेच असल्याचा अंदाजकापसाच्या जिनिंग प्रेसिंग प्रकियेला शासनाने अद्याप परवानगी दिली नाही. त्यामुळे कापूस मार्केट बंद आहे. आतापर्यंत जवळपास ७ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. कापूस खरेदी उशिरा सुरु झाल्याने शेतकऱ्यांकडे आताही जवळपास २० टक्के म्हणजे २ लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे शासनाने या कालावधीतच कापसाचीही खरेदी तत्काळ सुरु करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे. धान्य बाजारात गर्दी मर्यादित करण्यासाठी गरजूंनी आपल्या मालाची नोंद समिती कार्यालयात करावी. त्यांनतर दिलेल्या तारखेवर शेतमाल विक्रीसाठी आणून शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्य सुरक्षेची पुरेपुर काळजी घ्यावी.अ‍ॅड. सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड