गिरड : गिरड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दारूची वाहतूक करताना पकडण्यात आलेला आरोपी पोलिसाला चकमा देवून फरार झाला. या आरोपीच्या शोधात पोलीस असताना त्याला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी पहाटे करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव छत्रुघ्न जिवतोडे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सिर्सी येथून अवैधरित्या दारू आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी कारवाई करीत छत्रुघ्न पत्रु जिवतोडे (२०) रा. भद्रावती जिल्हा चंद्रपूर याला मंगळवारी गिरड पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस ठाण्याकडे परत आणत असताना बसस्थानक चौकातून पोलिसाला चकमा देवून पसार झाला होता. आरोपीच्या शोधात गिरड पोलिसांनी तीन तुकड्या करून या आरोपीचा शोध घेणे सुरू केले होते. सर्वत्र आरोपीचा शोध सुरू असताना तो चंद्रपूर जिल्ह्यातील त्याच्या गावी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी भद्रावती गाठत सापळा रचून त्याला अटक केली आहे.(वार्ताहर)
पोलिसाला चकमा देणाऱ्या आरोपीला भद्रावती येथून अटक
By admin | Updated: May 11, 2015 01:39 IST