शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

रुपेशच्या मारेकऱ्यांना अटक करा

By admin | Updated: November 13, 2014 23:05 IST

हत्या करून किडणी व डोळे चोरी करण्याचा एवढा मोठा प्रकार होऊनही कलेक्टर व एसपीसारख्या अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध असो, चौकशीत दिरंगाई करणाऱ्या

निषेध मोर्चा : लहान मुलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडेही वेधले लक्षवर्धा : हत्या करून किडणी व डोळे चोरी करण्याचा एवढा मोठा प्रकार होऊनही कलेक्टर व एसपीसारख्या अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे त्यांचा जाहीर निषेध असो, चौकशीत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांचा निषेध असो, रूपेश मुळे याच्या क्रूर हत्येचा निषेध असो, घोषणा देत गुरुवारी शहरातून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून रूपेशला न्याय द्या, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. घटना उघडकीस आल्यापासून पाच दिवसांचा कालावधी लोटला तरीही पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली नाही. आरोपीला अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही यावेळी मोर्चेकरी करीत होते. या मोर्चामध्ये वडार समाज बांधव लहानमुलांसह सहभागी झाले होते. शहरातील विविध सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्षांचे नेतेमंडळी देखील सहभागी झाले होते.स्थानिक आर्वी नाका चौकातून ११.३० वाजताच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. शिवाजी चौक, बजाज चौक मार्गे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचला. त्यानंतर एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाच्या माध्यमातून रूपेश मुळे मृत्यू प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्याची मागणीही करण्यात आली. जिल्ह्यात लहान मुलांवरील अत्याचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही भीती कायमची दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, याकडेही जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मोर्चेकरांनी पोलीस प्रशासन दिरंगाई आणि चुकीच्या पद्धतीने गंभीर प्रकरणे हाताळत असल्याबाबतही आपला रोष व्यक्त केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी आरोपी लवकर अटक करु, असे ठोस आश्वासन दिले. यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला. शिष्टमंडळात प्रा़ शिवाजी इथापे, मनोहर पंचारिया, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे व अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, नुतन माळवी, सुधीर पांगुळ, शारदा झामरे, तुषार देवढे, प्रशांत कुत्तरमारे, अविनाश काकडे, गजेंद्र सुरकार, बॉबी जगदळे, विजय आगलावे, मुन्ना झाडे, विल्सन मोखाडे, इम्रान कैसर यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)