शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आष्टीतील चोरीत नागपुरातील आरोपीला अटक

By admin | Updated: February 5, 2016 01:45 IST

बंद घरात रात्रीला हात साफ करणाऱ्या नागपूर येथील चोरट्याला आष्टी पोलिसांनी नागपूर येथून अटक केली.

चोरट्याला न्यायालयीन कोठडी : ५३ हजाराचा मुद्देमाल जप्तआष्टी (शहीद) : बंद घरात रात्रीला हात साफ करणाऱ्या नागपूर येथील चोरट्याला आष्टी पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंकज विघ्ने (२५) रा. नागपूर असे चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरीत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद पोलिसात आहे. पोलीस सुत्रानुसार, बाबाराव उरकुडे व अश्वीन धनगर रा. गणेशपूर वॉर्ड हे परिवारासह गावी गेले होते. त्यांची दोन्ही घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला. ही घटना १ फेबु्रवारी रोजी घडली. या घटनेबाबत शेजारी असलेले अनुप भाऊराव दहाट (३०) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला असता तो नागपूर येथील असल्याचे समोर आले. माहितीवरून पंकज मंचित विघ्ने रा. तुकडोजी पुतळा मानेवाडा, नागपूर याला अटक करण्यात आली. त्याने चोरीची कबुली दिली असून घरातील ७० हजार रुपये किंमतीचे दागिने, ४५ हजार रुपये रोख असा एकूण १ लक्ष १५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्याची रवानगी न्यायालयाीन कोठडी करण्यात आली. आरोपी पंकज विघ्ने हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई ठाणेदार दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)सोनसाखळी चोर पुन्हा सक्रीय वर्धा - गत काही दिवसांपासून बेपत्ता असलेले सोनसाखळी चोर वर्धा शहरात पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसते. शहरात सुरक्षेकरिता ठाण्यांची संख्या वाढली असता या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची सोनसाखळी पळवून पोलिसांना थेट आव्हाण दिल्याचे दिसून आले आहे. बुधवारी सायंकाळी स्वागत कॉलनी परिसरात रामनगर ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची सोनसाखळी चोरट्यांनी पळविल्याची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.