लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हिंदनगर येथील मंदा जाधव यांच्या कुलूपबंद घरावर काही तरुणांनी रविवारी रात्री हल्ला चढविला. यावेळी हल्लेखोरांनी जाधव यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर घरातून २५ हजार रुपये रोख लंपास केल्याचा उल्लेख मंदा जाधव यांनी रामनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत आहे.मंदा जाधव यांचा मुलगा वैभव याचा हिंदनगर भागातील छगनकर नामक तरुणाशी वाद झाला. याचा वचपा काढण्यासाठी आदर्श घोराडे, आकाश बोरकर व निखिल सुरशे यांनी मंदा जाधव यांच्या कुलूप बंद घरावर हल्ला चढवून घरातील टीव्ही, कुलर, दुचाकी व साहित्याची तोडफोड केली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. सदर नुकसानीचा आकडा लाखाच्या घरात असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदर्श घोराडे, आकाश बोरकर व निखील सुरेश यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४४९, ४५७, ४२७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यबाबत माहिती मिळताच एपीआय सचिन यादव, सुनील भगत, संतोष कोकडकर, आकाश चुंगडे, नरेंद्र कांबळे यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.
कुलूपबंद घरावर सशस्त्र हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:20 IST
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हिंदनगर येथील मंदा जाधव यांच्या कुलूपबंद घरावर काही तरुणांनी रविवारी रात्री हल्ला चढविला. यावेळी हल्लेखोरांनी जाधव यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नव्हे तर घरातून २५ हजार रुपये रोख लंपास केल्याचा उल्लेख मंदा जाधव यांनी रामनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीत आहे.
कुलूपबंद घरावर सशस्त्र हल्ला
ठळक मुद्देहिंदनगर येथील घटना : २५ हजारांची रोख पळविली