शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील सुरगावात वाळू माफियांच्या मनमर्जी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:05 IST

Wardha News वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव अद्यापही झाला नसला तरी सेलू तालुक्यातील सुरगाव शिवारात सध्या वर्धा आणि सेलू तालुक्यातील माफियांना वाळूचा हांडा लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देदररोज वारेमाप उपसानदीकाठचे शेतकरी साधताय लक्ष्मीदर्शनाचा योग

 लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव अद्यापही झाला नसला तरी सेलू तालुक्यातील सुरगाव शिवारात सध्या वर्धा आणि सेलू तालुक्यातील माफियांना वाळूचा हांडा लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सूर नदीपात्रातून हे माफिया दररोज वाळूचा वारेमाप उपसा करीत असून, काही वाळू माफिया नदीकाठावरील शेतकऱ्यांना गप्प राहण्यासाठी पैशांचे आमिष देत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. काही शेतकरी थेट लक्ष्मीदर्शनाचा योग साधत असल्याने वाळू माफियांचे चांगभलेच होत आहे.

सुरगाव शिवारात धांदे यांच्या शेताजवळ सूर, वाघाडी तसेच धाम नदीचा संगम आहे. याच भागात सध्या चांगल्या प्रतीची वाळू पावसाळ्याच्या दिवसांत वाहून आली आहे. तीनहून अधिक महिन्यांपासून सेलू तसेच वर्धा तालुक्यातील काही वाळू माफिया स्थानिक लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन वानखेडे तसेच धांदे यांच्या शेताशेजारी असलेल्या नदीपात्रातून मनमर्जी वाळूचा उपसा करून वर्धा शहरासह सेलू तालुक्यातील विविध भागांत पुरवठा करीत आहेत. गृहमंत्र्यांनी नुकताच वर्धा जिल्ह्याचा दौरा करून वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. परंतु, या सूचनांची या भागात कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. पोलीस, महसूल तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेऊन वाळू माफियांच्या मनमर्जी कारभाराला ब्रेक लावण्याची गरज आहे.

पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

वाळू माफियांकडून नदीपात्रात अवैध उत्खनन करून मनमर्जी वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदीचे पात्रच धोक्यात आले आहे. अवैध उत्खनन करताना वाळू माफियांकडून परिसरातील वृक्ष तोडली जात असल्याने पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे.

तस्करांचे केंद्र बनले दोन तालुक्यांची सीमा

ज्या भागात चांगल्या प्रतीची वाळू आहे आणि ज्या भागातून वारेमाप वाळूचा उपसा केला जात आहे, ते स्थळ वर्धा आणि सेलू तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस आणि महसूल विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांनीच लक्ष देत वेळीच धडक कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :sandवाळू