लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : देशातील दारिद्रयरेषेखालील कोट्यवधी लोक बेघर व निराधार आहेत. तुटपुंज्या वतनावर काम करणाºया सर्व सामान्य माणसाला आपला प्रपंच चालवून आपले घर बांधणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.नगरपालिकेत कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन खा. रामदास तडस, भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष शितल संजय गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, भाजप शहराध्यक्ष मंगेश झाडे, जिल्हा उपाअध्यक्ष राजीव बत्रा, जिल्हा सरचिटणीस नितीन बडगे, भाजप गटनेता राजू जयस्वाल, संजय गाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर न.प. चंद्रशेखर आझाद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बॅडमिंटन कोर्ट व नगरपरिषद व्यायाम शाळेच्या जागेचे भुमिपूजन खा. तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य व स्वच्छता सभापती ममता बडगे, सोनाली काळे, माधुरी इंगळे, चंपा सिध्दाणी, पुनम सावरकर, जयभारत कांबळे, गौरव दांडेकर, मुख्य अधिकारी प्रशांत उरकुडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सागर काळे, संचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विठ्ठल वानखेडे यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:28 IST
देशातील दारिद्रयरेषेखालील कोट्यवधी लोक बेघर व निराधार आहेत. तुटपुंज्या वतनावर काम करणाºया सर्व सामान्य माणसाला आपला प्रपंच चालवून आपले घर बांधणे शक्य होत नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करा
ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : पुलगाव नगरपालिकेत कार्यक्रम