शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य तेल, डाळींवरही आयात शुल्क लागू करा

By admin | Updated: June 25, 2014 23:55 IST

केंद्र शासनाने साखरेच्या आयातीवर ४० टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयामुळे साखरेच्या भावात ४० रुपये प्रती किलोच्या जवळपास झाले आहेत़ हा निर्णय स्वागतार्ह असून केंद्र

वर्धा : केंद्र शासनाने साखरेच्या आयातीवर ४० टक्के आयात कर लावण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयामुळे साखरेच्या भावात ४० रुपये प्रती किलोच्या जवळपास झाले आहेत़ हा निर्णय स्वागतार्ह असून केंद्र शासनाने खाद्य ते आणि डाळींच्या आयातीवरही आयात शुल्क लागू करावे, अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी अन्नमंत्री रामविलास पासवान यांना पत्रही पाठविले आहे़केंद्र शासनाने साखरेवर ४० टक्के आयात कर लागू करण्याचा निर्णध घेतल्याने देशातील कमी होणारे साखरेचे भाव स्थिर झाले़ यात साखर उत्पादकांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे़ हा निर्णय तेल बिया आणि डाळींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकरिता का लागू केला जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ सध्या देशातील ५० टक्के आवश्यक खाद्य तेल आयात केले जात आहे़ ३० लाख टन डाळीही आयात केल्या जात आहेत़ शेंगदाणा, चणा, तुरी या शेतमालाला समर्थन मूल्यही बाजारात मिळत आहे़ या पार्श्वभूमीवर खाद्य तेल आणि डाळींवरही साखरेप्रमाणे आयात कर लागू करण्याची घोषणा करावी़ तसेच निर्यात बंदी हटविण्यात यावी़ ही मागणी २००८ पासून केली जात आहे़ याबाबत डॉ़ मनमोहनसिंग यांचे सरकार असतानाही पत्र व्यवहार करण्यात आला; पण कुठलीही कारवाई झाली नाही़ अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी या मागणीकडे लक्ष देत खाद्य तेल व डाळींवर आयात कर लागू करण्याची मागणीही जावंधिया यांनी पत्रातून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)