शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

वर्धा जिल्ह्यात ८६ टक्के शासकीय धान्याचे आॅनलाईन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 17:33 IST

शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहे.

ठळक मुद्देगैरप्रकाराला आळा ई-पॉस प्रणाली ठरतेय फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: शासकीय धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सरकारने आॅनलाईन प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमधून सध्या ई-पॉस प्रणालीच्या सहाय्याने शासकीय धान्याचे वितरण होत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना मंजूर नियतनापैकी त्यांनी केलेले आॅनलाईन व आॅफलाईन वाटप यानुसार दुकानदारांकडे महिन्याअखेरीस शिल्लक असलेले धान्य वजा करून पुढील महिन्याचे नियतन मंजूर करण्यात येते. त्यामुळे पूर्वी होणाऱ्या शासकीय धान्याच्या काळ्या बाजाराच्या प्रकाराला बऱ्यापैकी आळा बसला आहे.वर्धा जिल्ह्यात एईपीडीएस कार्यान्वित आहे. जिल्ह्यातील एकूण ८४८ स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस प्रणालीचा वापर करून गरजूंना शासकीय धान्यसाठा अतिशय अल्प मोबदल्यात वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या आॅनलाईन प्रणालीचा वापर करून सुमारे ८६ टक्के गरजूंना शासकीय धान्य देण्यात येत असून ते १०० टक्के करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय विशेष प्रयत्न करीत आहे. रास्त भाव दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार आॅथेंटिकेशन झाले तरी धान्य वितरित करण्यात येते. ज्या लाभार्थ्यांचे आधार आॅथेंटिकेशन झाले नाही तसेच कुटुंबातील व्यक्तीचे नाव पॉस मशीनमध्ये आहे; पण आधार नाही अशांचे आधार सिडींग ई-केवायसी करून त्यास शासकीय धान्य वितरण प्रणालीचा लाभ देण्यात येत आहे. सदर दोन्ही पर्याय उपलब्ध नसल्यास राऊटेड आॅफीसर नॉमीनी यांच्या आधार आॅथेंटिकेशनच्या आधारे धान्य वितरण करण्यात येते. शिधापत्रिकेवरील माहिती ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका, आधार नोंदणी प्रत, शासकीय ओळखपत्र आदी कागदपत्रे प्राप्त करून लाभार्थ्याला शासकीय योजनेचा लाभ दिल्या जात आहे. एकूणच नवीन प्रणालीमुळे पूर्वी होणारा शासकीय धान्याच्या गैरप्रकाराला आळा बसल्याचे दिसून येते.१ हजार २२७ टन धान्याची बचतवर्धा जिल्ह्यासाठी शासकीय धान्य वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा मंजूर होतो. प्रत्येक महिन्याला त्याचे वितरणही केले जाते. वर्धा जिल्ह्यासाठी ३,७०९ मे. टन गहू तर २,९२० मे. टन तांदुळ नियतन आहे. त्यापैकी एईपीडीएस अंतर्गत ३ हजार १५ मे. टन गहू तर २ हजार ३८७ मे. टन तांदुळ आॅनलाईन धान्य वाटप करण्यात आले. तर उल्लेखनीय म्हणजे ६९४ मे. टन गहू आणि ५३३ मे. टन तांदळाची बचत झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.अल्प मोबदल्यात तूर दाळदिवसेंदिवस तूर दाळीचे दर वाढत असल्याने समाजातील दुर्बल घटकांना अनेक जीवनसत्व असलेली तूर दाळ सहज खरेदी करणे शक्य होत नाही. पौष्टीक आहार न घेतल्याने कुपोषण आपले पाळेमुळे घट्ट करू पाहत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. कुपोषणाच्या राक्षसाला जिल्ह्यातून जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी शासन निर्णयानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांना ३५ रुपये नाममात्र दरात तूर दाळ वितरित केली जात आहे. शासनाच्या विविध सूचनांना केंद्र स्थानी ठेवूनच तूर दाळ गरजूंना वितरित केली जात आहे.गरजूंसाठी १,४७० क्विंटल चना व उडीद डाळ प्राप्तदि. १७ आॅक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानातून गरजुंना अल्पदरात चना व उडिद डाळ वितरित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी वर्धा जिल्ह्याला ९८० क्विंटल चना तर ४९० क्विंटल उडिद डाळ प्राप्त झाली आहे. सदर डाळ गरजूंना वितरित केली जात आहे.हमीपत्रावर केरोसीनदिनांक १ आॅगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार पात्र लाभार्थ्यांकडून गॅस सिलिंडर नसल्याबाबतचे हमीपत्र घेवून त्यांना केरोसीनचे वितरण करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे. सदर वितरण प्रणालीत शासकीय नियमांना तंतोतंत पाळल्या जात असल्याने केरोसीनची मागणी कमी होऊन त्याची बचत झाल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनचा वापर करून शासकीय धान्याचे वितरण होत आहे. शिवाय हमीपत्र घेवून केरोसीनचे वितरण केले जात आहे. नवीन आॅनलाईन प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात धान्याची बचत झाली आहे. शिवाय केरोसीनची मागणी कमी होऊन त्याची बचत झाली आहे. कुठल्याही लाभार्थ्याला अडचण होत असल्यास त्याने थेट जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच लेखी तक्रार द्यावी.- अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा.

टॅग्स :Governmentसरकार