मागणी : सरपंच संघटनेचे प्रशासनाला साकडेआर्वी : खरीप हंगामातील शेतपिकांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. सतत तीन वर्षापासुन तालुक्यातील शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. या नापिकीच्या पार्श्वभूमीवर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे आर्वी तालुका सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.तालुक्यातील शेतकरी तीन वर्षापासून नापिकीचा सामना करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यातही सोयाबीन पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला तर रब्बी हंगामाबाबत काहीच शाश्वती नाही. कपाशी व तूर पिकांची अवस्था दयनीय आहे. तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन आर्थिक मदतीची मागणी आहे. यावेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा.धर्मेंद्र राऊत व शिष्टमंडळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आर्वी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा
By admin | Updated: October 21, 2015 02:28 IST