शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमधील प्राणी वर्ध्याच्या करूणाश्रमात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:04 IST

पैशाच्या वादातून उघड्यावर पडलेल्या अमरावती येथील अमर सर्कसमधील प्राण्यांची अडचण निर्माण झाली. ही अडचण समजून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती वर्ध्याच्या पीपल्स फॉर अ‍ॅनिमलला दिली. प्राण्यांकरिता कार्यरत असलेलया या संस्थेने रविवारी सकाळी सर्कसमधील २० जनावरांना ताब्यात घेऊन वर्ध्याच्या करूणाश्रमात दाखल केले.

ठळक मुद्दे२० जनावरांचा समावेश : पीपल्स फॉर अ‍ॅनिमलची कारवाई; करूणाश्रमात होणार औषधोपचार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :पैशाच्या वादातून उघड्यावर पडलेल्या अमरावती येथील अमर सर्कसमधील प्राण्यांची अडचण निर्माण झाली. ही अडचण समजून अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती वर्ध्याच्या पीपल्स फॉर अ‍ॅनिमलला दिली. प्राण्यांकरिता कार्यरत असलेलया या संस्थेने रविवारी सकाळी सर्कसमधील २० जनावरांना ताब्यात घेऊन वर्ध्याच्या करूणाश्रमात दाखल केले.अमरावती येथील सर्कस मैदान पाच लाख रूपये भाड्याने घेऊन येथे सर्कस सुरू करण्यात आली. मात्र, भाड्यापोटी अमरावती जिल्हा परिषदेला दिलेला धनादेश अनादरीत झाल्याने या सर्कस मालकाविरोधात पोलिसात तक्रार केली. तक्रार दाखल होताच सर्कस मालकाने कलावंतांसह पळ काढला. सर्कस मालकाने पळ काढल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सर्कसच्या साहित्याचा लिलाव करून आपले नुकसान भरून काढण्याचा निर्णय घेतला.लिलावाची माहिती मिळताच जप्तीत असलेल्या जनावरापैकी तीन उंटासह काही कलाकार पसार झाले. यातच तीन दिवस सुटी असल्याने या जनावरांची अडचण होईल, असे लक्षात आल्याने अमरावतीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडून ही जनावरे वर्ध्याच्या पीपल्स फॉर अ‍ॅनिमलच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार ही जनावरे वर्धेत आणण्याकरिता पीपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशीष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे, यांच्यासह कार्यकर्ते अमरावती येथे दाखल झाले असून जनावरे घेऊन वर्ध्यात आले आहेत.सर्वच प्राण्यांची अवस्था बिकटताब्यात घेण्यात आलेल्या या प्राण्यांची अवस्था बिकट असून त्यांना औषधोपचार करण्याची गरज असल्याची माहिती पीपल्स फॉर अ‍ॅनिमलचे आशीष गोस्वामी यांनी दिली.विविध पक्ष्यांसह घोडे अन कुत्रे झाले नवे पाहुणेया सर्कसमधून पीपल्स फॉर अ‍ॅनिमलने विविध प्रजातीचे पाच पक्षी, सात घोडे, आठ कुत्रे अशी एकूण २० जनावरे ताब्यात घेतली आहेत. येथील करूणाश्रमात दाखल झालेल्या या नव्या पाहुण्याबाबत सर्वत्र कुतूहल निर्माण झाले आहे. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांना चकमकी दरम्यान सापडलेले नक्षलवाद्यांचे घोडेही येथेच आणण्यात आले होते.