शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नागरिक जिल्हाकचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:41 IST

शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देवाघहल्ला प्रकरण : घटनेच्या रात्री पोलीस आणि नागरिकांत वाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा / आकोली : शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांच्याकडून वाघाचा बंदोबस्त करण्यासह मृतकाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तत्पूर्वी रविवारी रात्री परिसरातील संतप्त नागरिक आणि पोलिसांत चांगलाच वाद झाला.आज आमगाव व परिसरातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत या विषयावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान मृतकाच्या कुटुंबियाला चार लाख रुपये आता व चार लाख रुपये आठ दिवसांनी देवू, शिवाय मृतकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी गावकºयांना दिले. या आश्वासनावर गावकरी गावाकडे परतले. मागण्या दुर्लक्षित झाल्या असत्या तर गावकºयांकडून चेतनचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याची तयारी गावकºयांची होती. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर चेतन याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी व वन्यजीव विभागाने पाठ फिरविली. केवळ प्रादेशिक विभागाच्या अधिकाºयांची व गावकºयांची येथे उपस्थिती होती.पोलिसांचा उद्दामपणावाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकºयाचे कुटुंब घटनास्थळी गेले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांच्याकडून घटनास्थळाकडे धाव घेण्यात आली. घटनेमुळे नागरिक संतप्त असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे व ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांनी त्यांची समजूत घातली. पण गावकरी मृतदेह न देण्याच्या निर्णयावर ठाम होते. शेवटी रात्री १२ वाजता राज्य राखीव पोलीस दलाने बळाचा वापर करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी झालेल्या वादात मृतकाचे वडील दादाराव व भावाला पोलिसांकडून मारहाण झाली. सकाळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिल्याने कुटुंबिय आज सकाळी रुग्णालयात मृतदेह स्विकारण्यासाठी गेले.वनविभागाच्या पत्राला वन्यजीव विभागाचा ठेंगाआमगाव (जंगली), बोगावा (गोंडी), सुसूंद हा भाग न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. यामुळे या भागात वन्यप्राण्यांची ये-जा असते. यात वाघांचाही समावेश आहे. याचा त्रास गावकºयांना झाल्यानंतर वनविभागाने वन्यजीव विभागाला वाघ सांभाळण्याचे एक पत्र दिले होते. त्या पत्राला वन्यजीव विभागाकडून ठेंगा दाखविल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.