शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू शेकापूर येथील सिद्धार्थ मुन व त्याच्या सहकाऱ्यांनी एका अंगणवाडी सेविकेवर बलात्कार केला. या घटनेला बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी स्थानिक बच्छराज धर्मशाळा येथे मंगळवारी अंगणवाडी सेविकांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पीडितेला न्याय द्या, अशी ...

ठळक मुद्देन्यायासाठी शास्त्री चौक ते बजाज चौकापर्यंत मानवी साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू शेकापूर येथील सिद्धार्थ मुन व त्याच्या सहकाऱ्यांनी एका अंगणवाडी सेविकेवर बलात्कार केला. या घटनेला बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी स्थानिक बच्छराज धर्मशाळा येथे मंगळवारी अंगणवाडी सेविकांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करीत अंगणवाडी सेविकांनी शास्त्री चौक ते बजाज चौक पर्यंत मानवी साखळी तयार केली होती.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आयटकचे राज्य सचिव श्याम काळे तर प्रमुख अतिथी म्हणून किसान सभेचे अरुण वनकर, अंनिसचे गजेंद्र सुरकार, बी. के. जाधव, सिद्धार्थ तेलतुंबडे, ममता सुदरकर, दिलीप उटाणे, असलम पठाण, उषा चरभे आदींची उपस्थिती होती. सदर मेळाव्या दरम्यान व्यासपीठावरील मान्यवरांसह काही अंगणवाडी सेविकांनीही मनोगत व्यक्त केले. मनोगत व्यक्त करणाºयांनी अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.सदर मेळाव्याच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी सेलू येथील अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करणाºया आरोपीला त्वरित अटक करावी, या प्रकरणात प्रभावी कारवाई करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. शुभांगी उईके मृत्यू प्र्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.मेळाव्याला देवराव चवळे, मनोहर पचारे, विजया पावडे, वंदना कोळणकर, शबाना शेख, मैना उईके, मंगला इंगोले, सविता लुटे, वनिता कापसे, रचना जाधव, सिंधु खडसे, विणा पाटील, जयश्री चहांदे, नयन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.पोलिसांनी नाकारली मोर्चाची परवानगीअंगणवाडी सेविकेवर बलात्कार करणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार १७ एप्रिला वर्धा शहरातून मोर्चा काढण्याचे आयटकच्यावतीने निश्चित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगीसाठी रितसर आवेदनही केले. परंतु, शहर पोलिसांनी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात ‘एकाच कारणासाठी पुन्हा पुन्हा शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने आंदोलन सहेतुक जानीव पुर्वक करीत असल्याचे गोपनिय माहितीवरून आढळून आलेले आहे. तरी १७ रोजी मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात येऊ नये’ असा अहवाल पाठविला आहे. त्यामुळे उपविभागीय महसूल अधिकाºयांनी मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे आयटकच्या पदाधिकाºयांनी सांगितले.