शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन् २० वी पशुगणना अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:25 IST

प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, यंदा सुरूवातीपासून बहुचर्र्चित ठरलेली २० वी पशुगणनना आता पुन्हा प्रत्यक्ष काम करणाºयांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचे दिसते. पशुगणनेसाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत होती.

ठळक मुद्दे३१ डिसेंबर डेडलाईन : अधिकाऱ्यांना मुदत वाढीची अपेक्षा

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, यंदा सुरूवातीपासून बहुचर्र्चित ठरलेली २० वी पशुगणनना आता पुन्हा प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचे दिसते. पशुगणनेसाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत होती. सद्यस्थितीत विदर्भातील वर्ध्यासह कुठल्या जिल्ह्यात पशुगणनेचे किती काम झाले, याची माहिती जाणून घेतली असता जबाबदार अधिकाऱ्यांकडेच माहिती उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली. शिवाय त्यांनी पशुगणनेसाठी मुदतवाढ मिळेल, असे सांगून वेळकाढू धोरण अवलंबिल्याने २० वी पशुगणनना अपूर्णच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्राप्त माहितीनुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये पशुगणना होणे क्रमप्राप्त होते. परंतु, पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच २० व्या पशुगणनेचे प्रत्यक्ष काम २०१८ च्या आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्यास संबंधितांकडून हिरवी झेंडी देण्यात आली. ३१ डिसेंबर ही डेडलाईन देत संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करून टॅबच्या सहाय्याने २० वी पशुगणना पूर्ण करण्याचेही निश्चित करण्यात आले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात पशुगणनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवातही करण्यात आली. परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यातील किती पशुंची नोंद टॅबच्या सहाय्याने पशुसंवर्धन विभागाने घेतली, याची माहिती जाणून घेतली असता ही माहितीच वर्धा जिल्हा व नागपूर प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही पशुगणनना नेमकी कशा पद्धतीने होत आहे, याबाबत पशुसंवर्धन विभागातीलच कर्मचाऱ्यांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पशुगणना करणाऱ्यांना जिल्ह्यातील गावांसह शहरातील प्रत्येक घरात जावून पशुपालकाजवळ असलेल्या विविध पशुंची माहिती आॅन लाईन व आॅफ लाईन पद्धतीचा अवलंब करीत टॅबच्या सहाय्याने भरायची आहे, हे विशेष.टॅबमध्ये तांत्रिक बिघाडआॅनलाईन पद्धतीचा अवलंब करीत वर्धा जिल्ह्यातील पशुंची गणना करण्यासाठी ११४ टॅब, पॉवर बँक व सिम १५ आॅक्टोबरला उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या सहाय्याने प्रत्यक्ष कामही सुरू आहे. परंतु, टॅबमध्ये असलेले पूर्वीचे २.० अ‍ॅप वर्जन प्रत्यक्ष काम करणाºयांसाठी त्रासदायक ठरत असून त्यात तांत्रिक बिघाड येत असल्याने ३.० हे वर्जन टाकून पशुगणना करण्याच्या सूचना संबंधितांनी गणनेचे काम करणाºयांना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.टॅबचा वापर करून आॅनलाईन पद्धतीने पशुगणनेचे काम सध्या सुरू आहे. ३१ डिसेंबर ही पशुगणनेची अखेरची मुदत असली तरी सध्या कुठल्या जिल्ह्यात किती काम झाले, हे सांगता येत नाही. वरिष्ठांकडून पशुगणना पूर्णकरण्यासाठी कमीत कमी १५ दिवसांची मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा आहे.- डॉ. किशोर कुमरे, प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, नागपूर.२० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याला ११४ टॅब, सिम व पॉवर बँक प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष कामही सध्या सुरू आहे. परंतु, किती काम झाले, हे आमच्याकडे माहिती नसल्याने सांगता येणार नाही. ३१ डिसेंबर ही पशुगणना पूर्ण करण्याची अखेरची मुदत आहे.- डॉ. राजीव भोजने, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, वर्धा.