शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाच्या अभावातच मतदान साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:43 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार । कर्मचाऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी २४ मार्चला होऊ घातली आहे. याकरिता विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना कंट्रोल व बॅलेट युनिटचे जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात वितरण करण्यात आले. याकरिता सकाळी ८.३० वाजताच शिक्षक व इतर कर्मचाºयांना बोलावण्यात आले होते. मात्र, संकुल परिसरात सुविधांचा प्रचंड अभाव दिसून आला.मशीन घेण्याकरिता आलेल्या कर्मचाºयांना बसण्याकरिता पुरेशा मॅटिन नव्हत्या. सभा मंडपही अतिशय तोकडा होता. त्यामुळे कर्मचाºयांना उन्हातच जागा मिळेल तेथे जमिनीवरच बसावे लागले. पर्याय म्हणून अनेकांनी या परिसरातील वृक्षांचा आधार घेतला.सध्या उन्हाळयाचे दिवस आहेत. तापमान दिवसागणिक वाढत असतानाच पिण्याच्या पाण्याची याशिवाय पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.परिणामी, पाण्याविनाच सकाळपासून आलेल्या महिला, पुरुष कर्मचाºयांना ताटकळावे लागले. अनेक कर्मचारी पाण्याची बाटली खरेदी करण्याकरिता परिसरात फिरताना दिसून येत होते. निवडणूक विभागाचा ‘पुअर शो’ आणि झालेली गैरसोय यामुळे शिक्षक, कर्मचाºयांनी प्रचंड संताप व्यक्त केला.वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाकईव्हीएम मशिन वितरणाच्या ठिकाणी पोलीस विभागातर्फे कठडे लावण्यात आले होते. याच ठिकाणी दुतर्फा दुचाकी वाहने उभी करण्यात आली होती. येथून वाट काढताना कर्मचाºयांची चांगलीच दमछाक झाली.पिण्याच्या पाण्यासाठी कर्मचाºयांची भटकंतीजिल्हा क्रीडा संकुलात इव्हीएम मशिन वितरणाची व्यवस्था करण्यात आली. तत्पूर्वी या जागेची प्रशासनाकडून साधी पाहणीही करण्यात आली नाही. मंडप अर्धवटच टाकलेला होता. यातही महिला आणि पुरुष कर्मचाºयांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांनी जागा मिळेल तेथे आश्रय घेतल्याचे दिसून आले. गैरसोयीबद्दल कर्मचाºयांची नाराजी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीमुळे इतर ठिकाणे हाऊसफुल्ल असल्याने कर्मचाºयांची संकुलात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागला.अजय धर्माधिकारीनिवडणूक विभाग, वर्धा

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत