शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात २०० शेतकऱ्यांना ५७० एकर जमिनीचे वाटप; जमीन खरेदीसाठी ११ कोटींचे अनुदान

By अभिनय खोपडे | Updated: March 8, 2023 19:11 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजना

वर्धा: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटूंबांना उत्पन्नाचे हक्काचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविली जाते. या योजनेतून १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यात योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत २०२ शेतकऱ्यांना ५७० एकर शेतजमीन देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील गरीब लाभार्थ्यांकरीता ही योजना सन २००४-०५ पासुन राबविण्यात येत आहे. दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटूंबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावेत व त्यांच्यात आर्थिक स्थैर्यता निर्माण व्हावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनेने असंख्य कुटूंबांना दिलासा दिला आहे. या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील तसेच दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे. विधवा आणि परितक्त्‌या महिलांना प्राधान्य दिले जाते. लाभार्थी १८ ते ६० वयोगटातील असावा लागतो.

या योजनेंतर्गत ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायत जमीन देण्यात येते. पुर्वी जमिनीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध देण्यात येत होते. ऑगस्ट २०१८ पासुन मात्र शंभर टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यास शेतजमीन उपलब्ध करुन देण्यात येते. योजनेच्या सुरुवातीपासुन आतापर्यंत लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी ६५८ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी ५७० एकर जमीनीचे २०२ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. 

सन २०२१-२२ मध्ये आर्वी व आष्टी तालुक्यातील ३६ एकर जिरायती व ८१ एकर बागायती जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन ४६  लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. यावर्षी जमीन विक्रीच्या प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जमीन खरेदीची प्रक्रीया सुरु आहे. योजनेतून १०० टक्के अनुदानावर जमीन उपलब्ध झाल्याने अनेक भूमिहीन शेतमजूरांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडून आला आहे.