शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

३०० लोकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:36 IST

गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे.

ठळक मुद्देदुर्गंधीयुक्त पाण्याच्या विरोधात आष्टीकर एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे. गुरूवारी ३०० महिला, पुरुष मंडळींनी नगरपंचायतवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रकरण चांगलेच तापले आहे. आंदोलक मोर्चेकरांनी शुध्द पाणी न दिल्यास लढा तीव्र करणार असल्याचे सांगितले.ममदापूर तलावामध्ये अनेक वर्षापासून गाळ उपसला नाही. तेथून जलशुध्दीकरण केंद्रावर येणारे पाणी सडके व दुर्गंधीयुक्त आहे. पावसाळा सुरू होण्याआधी नगरपंचायतीने काहीही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे दुषित सडके पाणी पिण्यात गेल्याने भयंकर परिस्थिती चिघळली आहे. साथीच्या आजाराची लागण होण्याची लक्षणे आढळून आली आहे. नगरपंचायत करवसूली करतात, मात्र स्वच्छ पाणी पुरवित नाही. यासाठी आष्टीकरांनी बरीच वाट पाहिली, तरीसुध्दा काहीच हालचाल झाली नाही.याप्रकरणी २५ जुलैला लोकमतमध्ये ‘२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ’ दुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी महिला व पुरुष मंडळी यांनी दुपारी १ वाजता नगरपंचायतमध्ये मोर्चा आणला. मुख्याधिकारी पंकज गोसावी यांना सर्व मोर्चेकरांनी घेराव घातला. एका कॅनमध्ये पिवळे पाणी आणले ते पाणी मुख्याधिकारी यांनी पिवून दाखवावे असे आवाहन केले. सत्ताधारी पदाधिकारीही हजर होते. त्यांनी यावर काहीही उत्तर दिले नाही. प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छ पाणी देवू, असे मुख्याधिकारी सांगत होते. मात्र सद्यातरी काहीही पर्यायी उपाययोजना केल्या नाही.आरोग्य विभागाकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणीनगरपंचायतमधील पाण्याचा प्रश्न सद्यातरी चांगलाच पेटला आहे. बुधवारी जलशुद्धीकरण केंद्राची आरोग्य विभागाने पाहणी केली. विरोधी पक्षाने भाजपा सदस्यही पाणी प्रश्नावर संतप्त झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याच्या आश्वासनावर सध्या आंदोलक मोर्चेकरी आठवडाभर प्रतीक्षा करणार असल्याचे सांगितले. तात्काळ शुध्द पाणी न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा, इशारा मोर्चेकरांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण