शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

व्हील्स इंडियात कामगारांच्या शोषणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:46 IST

देवळी येथील मे. व्हील्स इंडिया लिमिटेड कंपनीत अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण होत असल्यामुळे कामगारांत असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देआयटक लढा उभारणार : १५ सदस्यीय कार्यकारिणीचे गठन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी येथील मे. व्हील्स इंडिया लिमिटेड कंपनीत अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण होत असल्यामुळे कामगारांत असंतोष पसरला आहे. कामगारांनी बोनस, पगार स्लिप मिळावी, म्हणून कंपनी प्रशासनाकडे लेखी विनंती केली होती. मात्र, पाच वर्षांपासून ही मागणी मान्य करण्यात आली नाही. मागणी कराल तर कामावरून कमी करू, अशी धमकी दिली जात आहे, अशी माहिती आॅल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्यावतीने देण्यात आली आहे.व्हील्स इंडिया कंपनीतील कामगारांच्या शोषणाविरोधात आयटक लढा उभारणार असल्याचे उटाणे यांनी सांगितले. कुठल्याही उद्योगात नियमीत अथवा कंत्राटी कामगारांना वेतन स्लिप मिळणे क्रमप्राप्त आहे. तसेच कामगारांना हेल्मेट, जोडे आदी देणे कंपनी प्रशासनाला बंधनकारक आहे. तसा कायदाही आहे. बोनसची मागणी केली म्हणून कामावरून कमी करता येत नाही. आयटक कामगारांच्यावतीने या प्रश्नावर व्हिल्स इंडिया लि. प्रशासनाशी चर्चा करणार आहे. तसा ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आयटकने दिली. बुधवारी देवळी येथे कामगारांची सभा दिलीप उटाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी संघटनेची १५ सदस्यीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली. प्रशासन न्याय देत नसेल तर जिल्हाधिकारी व सरकारी कामगार अधिकारी यांच्या मध्यस्तीने प्रश्न निकाली काढण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. लवकरच कामगारांच्या न्यायिक मागण्यांसाठी लढा उभारला जाईल, असा इशारा आयटकने दिला आहे.कामगारांच्या समस्याकंपनीत कामगारांचा प्राव्हिडंड फंड व कामगार विमा योजनेत समाविष्ट केलेला नाही. पी.एफ काढण्यासाठी कामगारांकडून २००० रूपये घेतले जातात. सर्वच कामगारांना ३३७ रूपये प्रति दिवस वेतन देण्यात येते. त्यात कामानुसार वर्गवारी नाही. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता दिला जात नाही. इएसआयचे पैसे वेतनातून कपात केले जाते. त्याचे कार्ड दिले जात नाही.