शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

रेल्वे स्थानकावर अलर्ट

By admin | Updated: January 4, 2016 04:18 IST

रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याने दहशतवाद विरोधी पथकाच्या सूचनेवरून राज्यातील रेल्वे स्थानकावर

वर्धा : रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्याने दहशतवाद विरोधी पथकाच्या सूचनेवरून राज्यातील रेल्वे स्थानकावर अलर्ट घोषित करण्यात आला. याच पार्श्वभूमिवर वर्धेतही रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. येथील सेवाग्राम (वर्धा इस्ट) आणि मुख्य रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी सकाळपासून तपासणी मोहीम राबविली जात आहे. अचानक सुरू झालेल्या या तपासणीमुळे काही प्रवाश्यांमध्ये कुतूहल तर काही प्रवाश्यांत भीती निर्माण झाल्याचे दिसत होते. मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाला दिल्लीहून कानपूरला जाणारी रेल्वेगाडी उडविण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. त्याची माहिती राज्यातील सर्वच रेल्वे स्थानकावर देण्यात आली. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांना सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्ध्यातील सेवाग्राम तसेच मुख्य रेल्वेस्थानकावर जीआरपी, आरपीएफकडून रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. सकाळपासूनच दिल्लीकडून येणाऱ्या विविध गाड्यांची तपासणी करण्यात आली. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर अंदमान, जीटी तर मुख्य रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र आदी गाड्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती सेवाग्राम रेल्वे पोलीसचे उपनिरीक्षक के.सी. जटालीया यांनी दिली. तपासणी मोहिमेत जीआरपीएफचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) श्वान पथकामार्फतही तपासणी ४रेल्वेगाड्यांची तपासणी करताना श्वान पथकही सोबत ठेवण्यात आले होते. आज सकाळपासूनच रेल्वे गाड्यांची तपासणी सुरू झाल्याचे प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाल्याचे दिसत होते. ४दिल्लीवरून येणारी गाडी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहोचताच जीआरपीएफच्या पोलिसांकडून त्याची तपासणी करण्यात आली. बॉम्ब रोधक पथकाकडून झालेल्या तपासणीने प्रवासी चकीत झाले.