शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणातच लाल परी रुसली; एसटीची चाके आगारातच बसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून संप कायम ठेवला. वर्धा आगारातून या दिवसात एकही बस बाहेर पडली नाही. इतर आगारातील मोजक्याच बसफेऱ्या सुरु होत्या. त्या रविवारी बंद करण्यात आल्यात. ऐन दिवाळीच्या दिवसात लालपरी आगारातच थांबली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली असून महामंडळाला कोट्यवधीचा फटका बसला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी एसटी कामगार संयुक्त कृति समितीअंतर्गत २८ ऑक्टोबरपासून अचानक संप पुकारला. शासनाने काही महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यामध्ये वाढ केल्याने कृति समितीकडून हा संप मागे घेण्यात आला. मात्र, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून संप कायम ठेवला. वर्धा आगारातून या दिवसात एकही बस बाहेर पडली नाही. इतर आगारातील मोजक्याच बसफेऱ्या सुरु होत्या. त्या रविवारी बंद करण्यात आल्यात. ऐन दिवाळीच्या दिवसात लालपरी आगारातच थांबली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली असून महामंडळाला कोट्यवधीचा फटका बसला आहे. 

२,११,००,००० रुपये एसटीचे नुकसान-   वर्धा, आर्वी, तळेगाव (श्याम.पंत), पुलगाव आणि हिंगणघाट हे पाच आगार असून दररोज ८५० बसफेऱ्यांचे नियोजन आहे. या संपामुळे वर्धा आगार ११ दिवसांपासून बंद आहे.-   तळेगाव आगारातील बससेवा आजपर्यंत सुरू होती, तर इतर आगारातील मोजक्याच बसफेऱ्या सुरू होत्या. पण, रविवारी सर्वच  बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने आतापर्यंतच्या २ कोटी ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रवाशांच्या खिशाला कात्री-   दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक  एसटी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतात. पण, सध्या संप सुुरू असल्याने बसस्थानकावर शांतता दिसून येत आहे. बसेस नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे.-   या दिवसात बसस्थानकावरील गर्दी आता खासगी वाहन स्थळावर दिसून येत आहे. खासगी वाहनचालकांकडूनही या संधीचा फायदा घेतल्या जात आहे. वाढीव तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. गावखेड्यातील बसेस बंद असल्याने ऑटोशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे प्रवास महागल्याने खिशावर ताण पडत आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

एसटी कर्मचाऱ्याच्या पदरात काय पडले?-   वेतनवाढीचा दर ३ टक्के तर भत्तावाढ ८,१६,२४ नुसार लागू करावी. कर्मचाऱ्यांना वाढीव ५ टक्के भत्ता लागू करावा. ऑक्टोबर २०१९ पासून १२ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, आदी मागण्यांकरिता एसटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने २८ ऑक्टोबरला अचानक उपोषण सुरू करून संप पुकारला. -   शासनाने तातडीने बैठक बोलावून एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाड्यातही वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेते. परंतु कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करा, हा मुद्दा दुर्लक्षित राहिल्याने याकरिता कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला.

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पाचही आगारात टप्प्या टप्प्यात संप सुुरू केला आहे. काही आगार पहिल्या दिवसांपासून बंद आहे. दिवाळीच्या हंगामात प्रवाशी संख्या जात राहत असल्याने दरदिवसाला ३५ लाखांची मिळकत होते. पण, आता या संपामुळे दिवाळीचा हंगाम केल्याने दोन कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. विजय घायडे, विभागीय वाहतूक अधिकारी, वर्धा

 

टॅग्स :state transportएसटी