शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘शोषखड्डे’ तयार करून जिल्ह्यात जोपासला जातोय ‘स्वच्छ’चा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली असून १०८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात स्वच्छ भागात मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्थायित्व व सुजलाम् अभियान राबविले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ व सुंदर गावाच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून गावागावांत सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. आतापर्यंत तब्बल ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून तब्बल १ हजार २८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण होत आहे. अवघ्या १०० दिवसांत तब्बल ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा असून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.आष्टी तालुका अव्वल-    जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली असून १०८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहे.

प्रत्येक पंचायत समितीला पाच हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट-    अवघ्या १०० दिवसांत जिल्ह्यात ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा मानस असून जिल्ह्यातील आठही पंचायत समितींना प्रत्येकी ५ हजार शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पंचायत समितींचेही बारकाईने लक्ष आहे.

निरोगी ग्रामस्थांसाठी शोषखड्डे महत्त्वाचे-    नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्याने वाहते. बहुधा सांडपाण्याचे डबके नागरिकांच्या घराशेजारीच साचत असल्याने ग्रामस्थांना डासांच्या त्रासाला तसेच डासांपासून होणाऱ्या कीटकजन्य आजारांना सामोरे जावे लागते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागावी तसेच निरोगी ग्रामस्थ यासाठी शोषखड्डे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी गावासाठी शोषखड्डे महत्त्वाचे आहेत. शोषखड्ड्यांमुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत असून  प्रत्येक गावातील नागरिकांनी स्थायित्व व सुजलाम् अभियानात सहभागी होऊन गावात जास्तीतजास्त शोषखड्डे तयार करून सहकार्य करावे.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, वर्धा.

उघड्यावरील सांडपाण्याची गावस्तरावर समस्या असून यापासून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. स्वच्छ व निरोगी गाव परिसराच्या उद्देशाने प्रत्येक घरी शोषखड्डा नागरिकांनी तयार करावा.- यशवंत सपकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जि.प., वर्धा

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान