शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

ग्रामपंचायतच्या वतीने कृषी विषयक चर्चासत्र

By admin | Updated: May 27, 2014 23:55 IST

खरीप पिकांचे पुनर्नियोजन करण्याच्या उद्देशाने ग्रा.पं. पवनार येथे शेतकरी वर्गासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे, कृषीभूषण

पवनार : खरीप पिकांचे पुनर्नियोजन करण्याच्या उद्देशाने ग्रा.पं. पवनार येथे शेतकरी वर्गासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे, कृषीभूषण डॉ. नंदकिशोर तोटे, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक निखील रंजन, सरपंच अजय गांडोळे, उपसरपंच जगदीश पेटकर प्रामुख्याने हजर होते.

चर्चासत्रात मार्गदर्शन करताना कृषी अधीक्षक बर्‍हाटे यांनी पेरण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गत हंगामात अतवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाले. प्रयोगशाळेत परिक्षण केले असता सोयाबीन बियाण्यावर सहा प्रकारची बुरशी आढळून आली असून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया न केल्यास बुरशी वाढून उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता ही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

सोबतच घरची बियाणे उगवन क्षमता तपासून वापरण्यावरही त्यांनी भर दिला. बँकेकडून दिल्या जाणार्‍या पीक कर्जाचा आढावा घेताना काही जाचक अटीतून शेतकर्‍यांना सुट देण्याची विनंती व्यवस्थापकांना केली. पीक कर्ज घेण्याकरिता बँकांनी फेर फार पंजीची अट टाकली होती. त्या करिता जवळपास दोन आठवडे लागतात. सोबतच १ लाखाच्या वर कर्ज घेतले असता धारकाला डिक्लेरेशन सब रजिस्टार कडे फाईल करावे लागते. याकरिता 0.५ टक्केचा भुर्दंड धारकाला पडतो. त्यावर विचार-विनिमय व्हावा असेही बर्‍हाटे यांनी त्यांनी सुचविले.

चर्चासत्रात अनेक शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी मांडल्या. यात प्रामुख्याने पीक विमा योजना, गारपीटग्रस्तांना, अतवृष्टीधारकांना मिळणारी मदत, शासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या सोयी सुविधा सर्वसाधारण शेतकर्‍यांपर्यंत पोहचण्यास येणार्‍या अडचणी हे कळीचे मुद्दे होते. या सर्व बाबींवर प्रकाश टाकत कृषी अधीक्षकांनी शेतकर्‍यांना समाधानकारक उत्तर दिले.

किसान क्रेडिट कार्डचा वापर शेतकर्‍यांकडून होत नसल्याची खंत बँकेचे व्यवस्थापक रंजन यांनी बोलून दाखविली,. या बाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन करुन त्या मेळाव्यामध्ये किसान क्रेडिट कार्डचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा उपयोग शेतकर्‍यांनी घ्यावा असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ. तोटे यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी सरी वरंबाचा वापर करावा असे आवाहन करून कृषी विभागाने सरी वरंब्याचे यंत्र उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले.

ग्रा.पं.च्या वतीने कृषी चर्चासत्राचे प्रथमत: आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी ग्रामपंचायत सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांनी धन्यवाद दिले. चर्चासत्राचे संचालन व आभार श्रीकांत तोटे यांनी केले. चर्चासत्राला परिसरातील अनेक शेतकरी आणि गावातील इतरही नागरिक या चर्चासत्राला उपस्थित होते.(वार्ताहर)