लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथे कित्येक वर्षांपासून कृषी विभागाच्या कार्यालयासाठी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, तेथे कार्यालय स्थानांतरित न करता भाडेतत्त्वावरील घरात चालविले जात आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीलाच झळ पोहोचत आहे.कृषी कार्यालयासाठी यशवंत विद्यालयाजवळ इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथे कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात आला असून कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.परिसरादेखील स्वच्छ करण्यात आला असून कार्यालय अद्याप स्थानांतरित का करण्यात आले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. यात दहा ते बारा वर्षांपासून शासनाच्या तिजोरीतून किरायाची रक्कम जात आहे. याकडे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. कृषी अधिकारी एस. मेश्राम व सहायक पंकज चौधरी यांना विचारले असता त्यांनी कृषी कार्यालयाची दुरुस्ती झाली असून रंगरंगोटी झाली आहे. परिसराची स्वच्छता करण्यात आली असून लवकरच नव्या इमारतीत कार्यालय स्थानांतरित करण्यात येईल, असे सांगितले.
इमारत असूनही कृषी कार्यालय भाड्याच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST
कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात आला असून कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
इमारत असूनही कृषी कार्यालय भाड्याच्या घरात
ठळक मुद्दे१२ वर्षांपासून शासनाच्या तिजोरीला झळ