शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साई यात्रा महोत्सवात कृषी मार्गदर्शन व मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:07 IST

श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सल्ला : कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व यात्रा समितीचा संयुक्त उपक्रम

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मनोहर मंगरूळकर तर मार्गदर्शक म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर, अतिथी म्हणून जि.प. शिक्षण आरोग्य सभापती जयश्री गफाट, माजी सरपंच दीपक बावणकर, तालुका कृषी अधिकारी एस.एस. मुडे, पं.स. कृषी अधिकारी राऊत उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना भारती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदर योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. उंबरकर यांनी सध्या शेतकऱ्यांची समस्या असलेल्या बोंडअळीचे आक्रमण यावर सविस्तर माहिती दिली. ३ डिसेंबरच्या शेवटपर्यंत बाधित कपाशीचे पीक नष्ट करावे. यामुळे पुढील वर्षी हा प्रादुर्भाव होणार नाही, असेही सांगितले.याप्रसंगी प्रगतशील शेतकरी मुरलीधर चौधरी बोरगाव, सुनील भालेराव पेठ यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनील गफाट यांनी केले. संचालन मोहीन शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक बावनकर यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृषी सहायक रोहन अवचार, वहाने, निमजे, विजय गोमासे, संतोष बालपांडे, सुरेश गिरडकर, सुनील हंबर्डे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला आंजी (मो.) आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यामध्ये कृषी विभाग तथा विविध संस्था, शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनाचे प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला भेट देत अधिकारी व शेतकऱ्यांनी पिकांबाबत माहिती जाणून घेतली. यात्रा महोत्सवात अशा प्रकारचे आयोजन केल्याने नागरिकांनीही बोध घेतला.प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना मिळाले नवे ज्ञानश्री संत साई यात्रा महोत्सवाचे निमित्त साधून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा तथा यात्रा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. यात कृषी विभाग, संस्था व प्रगतशील शेतकºयांनी उत्पादनाचे प्रदर्शनही लावले होते. या प्रदर्शनातून शेतकºयांना नवे ज्ञान प्राप्त करता आले.