शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

वर्धेतील गोलबाजारात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांना अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने दुकानातील तसेच दुकानाबाहेरील साहित्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते.

ठळक मुद्दे२२ हातगाड्यांसह २४ दुकाने खाक : छोट्या व्यावसायिकांना मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरतील मुख्य बाजारपेठ भागातील गोलबाजार परिसरात रविवारी सकाळी  ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात २४ दुकानातील साहित्य तसेच तब्बल २२ हातगाड्या जळून कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांना अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने दुकानातील तसेच दुकानाबाहेरील साहित्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, न.प. मुख्याधिकारी विपिन पालिवाल, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तर मारोती वाघाडे, किशोर गाडेवान, चंदू तपासे यांनी पंचनामा केला.

गल्ल्यातील रोकडीचाही झाला कोळसाअचानक लागलेल्या आगीत दुकानातील विविध साहित्यासह गल्ल्यातील रोकडीचाही जळून कोळसा झाल्याने या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

श्वानाच्या चार पिल्लांचा होरपळून मृत्यूअचानक लागलेल्या आगीत श्वानाच्या चार पिल्ल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याची नोंदही पंचनामा करते वेळी पोलिसांनी घेतली आहे.

अचानक लागलेल्या आगीचे कारण गुलदस्त्यात या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असली तरी आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

या व्यक्तींची जळाली दुकानेगोलबाजार परिसरात लागलेल्या आगीत सुशील देशभ्रतार, राजेंद्र खेकडे, बबन ठाकरे, प्रफुल्ल भोयर, प्रमोद भोयर, गजानन आडे, माणिक ठेंगळे, वहिद खान गफ्फार खान, राजेश संगलनी, असलम बेग मिर्झा बेग, कमलेश चकोले, राजू हरजे, मोहम्मद अंसार शेख, मनोज भेंडारे, रामकिशन गुप्ता, रवींद्र वैद्य, अविनाश बंडेवार, आशिष लोणकर, अशोक भोवरे, वसंता पिंपळे, प्रेमचंद गुल्हाणे, रामू शेंडे, शेख इमान शेख सत्तार कुरेशी, शेख शाहरुख कुरेशी यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले.

या व्यक्तींची जळाली हातगाडीअचानक लागलेल्या आगीत किरण गुजर, दिनकर ढोबळे, साजीद सय्यद सईद सय्यद, नीरज हरगे, तन्वीर बेग अस्लम बेग, मुबारक मेहबूब कुरेशी, शेख आदील शेख सलीम, भागवत म्हस्के, संतोष लोहकरे, शरद पाटील, राहुल कांबळे, केशव ठाकरे, मयूर तिवस्कर, महेश खेकडे, आकाश शेंडे, सतीश दांडेकर, सुदेश मून, जुनेस शेख हुसेन, गौरव पांडे, अमोल देशभ्रतार, सुनील हरगे, तौसिफ खान करिम खान यांच्या हातगाडीसह हातगाडीवरील संपूर्ण साहित्य जळाले.

 

टॅग्स :fireआग