शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

संथारा निर्णयाविरोधात सकल जैन समाज रस्त्यावर

By admin | Updated: August 25, 2015 02:37 IST

जैन धर्मात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या संथारा व्रतावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात

वर्धा : जैन धर्मात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या संथारा व्रतावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्यावतीने सोमवारी वर्धा, हिंगणघाट व पुलगाव शहरातून शांती मार्र्च काढण्यात आला. या माध्यमातून सदर निर्णयात केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी, हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी तर पुलगाव येथे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवदेन केंद्र शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर केंद्र शासनाने हस्तक्षेत करून मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय यात विविध धार्मिक व कायद्याच्या बाबीवरही माहिती देण्यात आली आहे. वर्धेतील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून काढण्यात आलेला शांतीमार्च इंदिरा मार्केट, सोशालिस्ट चौक, मारवाडी मोहल्ला, आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी संबंधीत मागण्याचे निवदेन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना सोपविण्यात आले. निवेदन देतेवेळी जैन श्वेतांबर चंद्रप्रभु मंदिरचे ट्रस्टी योगेश फत्तेपुरिया, सुपार्श्वनाथ दिगांबर जैनचे अध्यक्ष सतीश रोडे, नगरसेविका लता जैन, वर्धमान स्थानिक श्रावक जैन संघाचे अध्यक्ष निर्मल चोरडिया, भारत जैन महामंडळचे अध्यक्ष महावीर पाटणी, महावीर दिगांबर जैन मंदिरचे अध्यक्ष सुनील मांडवगडे, नवखंड, पद्मावती सहित पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिरचे अध्यक्ष राजेश भुसारी, भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष नरेंद्र भागवतकर, जैन सैतवाल संगघटनाचे अध्यक्ष नितीन भागवतकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.(प्रतिनिधी) तहसीलदारांना निवेदन पुलगाव : उच्च न्याययालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुलगावातही सकल जैन समाजाने सकाळी शांतीमार्च काढून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. सकाळी स्थानिक महावीर भवनात नमोकार मंत्राचा जाप करून निघालेल्या शांतीमार्चमध्ये भारतीय जैन संघटना स्थानिकवासी श्रावक संघ, दिगंबर जैन महासमिती, सैतवाल दिगंबर जैन संघटन, खंडेलवाल दिगंबर जैन समाज इत्यादी जैन संघटनांचा समावेश होता. तहसीलदारांना प्रा. प्रकाशचंद्र श्रीश्रीमाल, सुभाष झांझरी, प्रफुल दर्डा, अश्विन शाह, सुभाष लुंकड, अतुल पडधारीया, पंकज श्रीश्रीमाल , प्रभाकर शहाकार यांच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सोमवारी दुपारपर्यंत समाज बांधवांची व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.(तालुका प्रतिनिधी)एसडीओंना निवेदन हिंगणघाट : येथील जैन मंदिरातून निघालेला शांतीमार्च उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी उपविभागीय अधिकारी भुगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी दिनेश कोचर, अ‍ॅड. सुधीर कोठारी, अनिल कोठारी, राजेंद्र डागा, अशोक गांधी, शांतीलाल कोचर, श्रीचंद कोचर, हरीष कासवा, राजेश कोचर, शेखर चोरडिया, अरूण बैद, तेजमल गांधी, विजय मुभ्भा, नितीन लुनावत, सुभाष कटारीया, रूपेश लोढा, सुनील पितलिया, डॉ. राहुल मरोठी, पंकज कोचर, अनु मुनोत आदी दिगांबर, स्वेताबंर व स्थानकवासी जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी होते.(तालुका प्रतिनिधी)