शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

अडीच वर्षांनंतर महाशिवरात्रीला फुलली शिवालये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप्त असून, महाशिवरात्रीचे औचित्य साधून या ठिकाणी अनेक भाविकांनी काेविड नियम पाळून मंगळवारी भोले शंकराचे दर्शन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकट ओढावताच पहिले लॉकडाऊन जाहीर करीत भाविकांसाठी विविध मंदिरे बंद करण्यात आली. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात मृत्यू तांडवच घडविले. अशातच सध्या जिल्ह्यात कोविडची तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्याने तब्बल अडीच वर्षांनंतर महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांनी शिवालय गाठून महादेवा चरणी माथा टेकविला. एकूणच महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध शिवालयांत भाविकांचा मळाच फुलला होता. ‘बम बम भोले’ असा जयघोष करीत महिला आणि पुरुष भाविकांनी आज पहाटेपासूनच शिवालयांत दर्शनासाठी गर्दी केली होती.

कोटेश्वरला फुलला भाविकांचा मळा-    देवळी तालुक्यातील कोटेश्वर या तीर्थक्षेत्रस्थळी वर्धा नदीच्या उत्तर दिशेला किनाऱ्यावर हेमाडपंती असे भगवान शंकराचे मंदिर आहे. वशिष्ठ ऋषींनी येथे कोटी यज्ञ केल्याची आख्यायिका असून, या मंदिरावर अनेकांची श्रद्धा आहे. या तीर्थाला काशीसारखे महत्त्व प्राप्त असून, महाशिवरात्रीचे औचित्य साधून या ठिकाणी अनेक भाविकांनी काेविड नियम पाळून मंगळवारी भोले शंकराचे दर्शन घेतले.

वर्धा येथील प्राचीन महादेव मंदिर-    वर्धा येथील महादेवपुरा भागातील प्राचीन महादेव मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच महिला व पुरुष भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. -    पहाटे कावड यात्रेकरूंकडून अभिषेक, तसेच आरती झाल्यावर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. दर्शनासाठी आलेल्यांना कोविड नियमांचे पालन करावे, अशा सूचना सेवाकरी भाविकांना देत होते. 

ढगा भुवन परिसरात दर्शनार्थीचा मेळा-    आर्वी तालुक्यातील खरांगणा (मो.) नजीकच्या ढगा भुवन येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांनी भोले शंकरा चरणी माथा टेकविला. रापमचे निम्म्याहून अधिक कर्मचारी अजूनही संपात सहभागी राहून विलीनीकरणाचा लढा देत असले तरी मिळेल त्या वाहनाने भाविकांनी ढगा भुवन गाठून महादेवाचे दर्शन घेतले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पहारा दिला.

पोहणात झाला भोले शंकराचा जयघोष-    हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथील रुद्रेश्वर मंदिरावर अनेकांची आस्था आहे. प्रवेरसेन (पहिला) यांचा नातू तथा रुद्रसेन यांचा पुत्र पृथ्वीसेन याने पोहणा गावाची निर्मिती केली. पित्याच्या आठवणीसाठी रुद्रसेन मंदिराची स्थापना पृथ्वी सेनाने याठिकाणी केल्याचे सांगितले जात असून, प्राचीन काळातील हे मंदिर वर्धा नदीच्या काठावर आहे. याच ठिकाणी मंगळवारी महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्यांकडून कोविड नियमांचे पालन करून घेण्यात आले.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री