शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

पतीच्या आत्महत्येनंतर तीने रेटला संसाराचा गाडा

By admin | Updated: January 5, 2015 23:08 IST

शेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही.

गौरव देशमुख - वर्धाशेतकरी आत्महत्येमुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय भयान झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे पेरलेले पिकले नाही आणि उगवले त्याला भाव मिळाला नाही. अशा अवस्थेत शेतकरी सरकारकडे अपेक्षा लावून आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (टालाटुले) येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी रंजना रमेश देशमुख हिने स्वत:च्या हिमतीवर, घाम गाळून शेती फुलवून, संसाराचा गाडा यशस्वीपणे रेटला. आत्महत्येच्या गर्तेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रंजनाचे कर्तुत्त्व प्रेरणादायी ठरणारे आहे. वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.) येथील रमेश चपंतराव देशमुख या शेतकऱ्याने २७ जुलै २००४ रोजी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. ही आत्महत्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. याची दखल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतली. त्यांनी रंजना देशमुख यांच्या घरी येवून सांत्वन केले. आधार हरविलेल्या रंजना देशमुख यांच्या कुटुंबीयासाठी मदतही केली. मात्र ही मदत आयुष्यभर पुरणारी नव्हती. त्यामुळे रंजना यांनीच कुटुंबाची जबाबदारी घेतली. पतीच्या आत्महत्येनंतर दोन मुली आणि एका मुलाला जगविण्यासाठी, स्वत:कडे असलेल्या तीन एकर शेतीत राबायला सुरुवात केली. मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण यात कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे तिच्यासाठी आव्हानच होते. मात्र त्या खचल्या नाही, नवऱ्याने केलेली चूक तिने केली नाही. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर व मुलांचे संगोपन करण्याच्या तळमळीने ती शेतीत घाम गाळू लागली. पेरणी, निंदन, फवारणी, कापूस वेचाई सारेच काम स्वत:च करु लागली. तिच्या मेहनतीला फळ आले. मुलांचे दोन वेळेचे पोट भरेल, एवढी मिळकत तिला मिळू लागली. पुढे मुलीच्या लग्नाचा प्रश्न तीला भेडसावू लागला. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरत नसल्याने, त्यांनाही मजुरीला पाठवून लग्नासाठी पैसा गोळा केला. २००८ मध्ये मोठ्या मुलीचे लग्न केले. एकीचा लग्नाचा भार कसाबसा उतरल्यानंतर दुसरीच्या लग्नासाठी झुंज द्यावी लागली. शेतीतून आलेल्या मिळकतीतून लग्नासाठी गोळा केलेला पैसा अपुरा पडल्याने पुन्हा कर्ज काढावे लागले. २०१२ मध्ये दुसऱ्या मुलीचाही संसार थाटून दिला. गेल्यावर्षी अतिवृष्टी तर यावर्षी कोरडा दुष्काळ यामुळे शेतीचेही नुकसान झाले. मात्र इतरांसारखी न खचता अडचणीशी झुंज देत जिद्दीने या अस्मानी संकटाचा तीने सामना केला. प्रामाणिक प्रयत्न केल्यास, आयुष्यात नक्कीच नवी पहाट होईलघरी सोनिया गांधी आल्या होत्या. त्यांनी आर्थिक मदतीबरोबरच एकाला नोकरी व शेतीला लागून असलेल्या नाल्याचे रूंदीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. या दोन्ही आश्वासनांची अजूनही पूर्ती झाली नाही. मात्र अपेक्षा धरून मी बसले नाही. मुलांना जगविण्यासाठी, संकटाचा सामना केला. त्यात यशस्वीही ठरले. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांनीही खचून न जाता, जगण्याची तळमळ ठेवल्यास, प्रामाणिक प्रयत्न केल्यास, आयुष्यात नक्कीच नवी पहाट होईल. - रंजना रमेश देशमुख, मृतक शेतकऱ्याची पत्नी