शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

छाननीत ७५ अर्ज ठरविले बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:13 IST

येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्दे२९८ ग्रा.पं.ची निवडणूक : आता अर्ज मागे घेणाऱ्यांकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातली असून सोमवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदासह ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत पूर्ण करण्यात आली. या अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान सरपंचपदासाठी २० तर ग्रा.पं. सदस्यपदासाठीचे ५५ अर्ज बाद ठरविण्यात आले आहे. नामनिर्देशनपत्र छाननीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली असून बुधवार १३ मार्चला कुठल्या उमेदवार अर्ज मागे घेतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.तील एकूण ९४६ प्रभागांचे लोकप्रतिनिधी तसेच २९८ सरपंच ग्रामीण भागातील मतदार या निवडणुकीच्या निमित्ताने निवडूण देणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २४ मार्चला निवडणूक होऊ घातली आहे. वर्धा तालुक्यातील ५६, देवळी ४६, सेलू ३१, आर्वी २२, आष्टी (श.) १७, कारंजा (घा.) ३४, हिंगणघाट ५६ तर समुद्रपूर तालुक्यातील ३६ ग्रा.पं. मध्ये निवडणूक होणार असून ग्रा.पं. सदस्यांसाठी एकूण ५ हजार ९२३ तर सरपंचपदासाठी एकूण १ हजार ४३२ इच्छुकांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीच्या दिवशी ग्रा.पं. सदस्यपदासाठीचे ६२ तर सरपंचपदासाठीचे १३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ग्रा.पं.सदस्यपदासाठी ५ हजार ८६६ तर सरपंचपदासाठी १ हजार ४१२ नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्धा तालुक्यातील सहा ग्रा.पं.तील अर्ज अडकले चाळणीतवर्धा तालुक्यातील आंजी (मोठी), पवनार, मांडवा, वायफड, बोरगाव (मेघे) अन् सावंगी (मेघे) या ग्रा.पं.तील अर्ज छाननी दरम्यान अधिकाऱ्यांच्या चाळणीत अडकले असून विविध कारणांनी एकूण सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठीचे नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. ग्रा.पं. सदस्यपदासाठी प्राप्त झालेला आंजी (मोठी) येथील वॉर्ड २ मधील एक अर्ज, पवनार येथील वॉर्ड २ मधील एक अर्ज, मांडवा येथील वॉर्ड २ मधील एक अर्ज, वायफड येथील वॉर्ड ४ मधील एक अर्ज, बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड ५ मधील एक अर्ज तर सावंगी (मेघे) येथील वॉर्ड १ व ५ तसेच ६ मधील प्रत्येकी एक अर्ज विविध कारणांनी अवैध ठरविण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे मांडगाव येथील वॉर्ड २ मधील आणि वायफड येथील वॉर्ड ४ मधील ग्रा.पं. सदस्यपदाचा अर्ज जास्त अपत्य असल्याने अवैध ठरविण्यात आले आहेत. तर सावंगी (मेघे) आणि वायफड येथील सरपंचपदासाठीच्या प्राप्त अर्जांपैकी प्रत्येकी एकअर्ज दुबार अर्ज प्राप्त झाल्याने अवैध ठरविण्यात आला आहे. एकूणच वर्धा तालुक्यात सरपंचपदासाठीचे दोन तर ग्रा.पं. सदस्यपदासाठीचे नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत