शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

आश्वासनानंतर ‘त्या’ २० शिक्षकांचे उपोषण मागे

By admin | Updated: December 25, 2015 02:51 IST

२१ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. वर्धा यांच्या कार्यालयासमोर २० शिक्षकांनी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

वैयक्तिक मान्यता न मिळाल्याने शिक्षकांची होत आहे उपासमारवर्धा : २१ डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी (माध्य), जि. प. वर्धा यांच्या कार्यालयासमोर २० शिक्षकांनी मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या सांगण्यावरून आंदोलन मागे घेण्यात आले. २ मे २०१२ पूर्वी शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाची पद भरण्याची परवानगी घेवून नियमानुसार केलेल्या ६४ शिक्षकांच्या नियुक्त्यांपैकी २० शिक्षकांना काही त्रुटी अभावी जानेवारी महिन्याच्या शिबिरात वैयक्तिक मान्यता मिळू शकली नाही. परंतु दरम्यानच्या काळात सदर शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षणाधिकारी यांच्या चुकीमुळे पाठविण्यात आल्याचा आरोप संघटनेद्वारे करण्यात आला होता. त्यामुळे मागील साडेतीन वर्षापासून सदर शिक्षक विना वेतन विद्यादानाचे काम करीत होते. अन्यायग्रस्त शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात प्रलंबित असल्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी आॅगस्ट व आॅक्टोबर महिन्यात नियमानुसार घ्यावयाचे वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन केले नाही. दरम्यानच्या काळात अन्यायग्रस्त शिक्षकांसह वैयक्तिक मान्यता मिळण्याबाबत तक्रार निवारण समितीच्या वतीने तीनवेळा आंदोलने करण्यात आली. तरीही न्याय न मिळाल्याने त्या २० शिक्षकांनी पुन्हा २२ डिसेंबरपासून जि. प. समोर आंदोलन सुरू केले होते. २३ डिसेंबरला शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी १५ दिवसांच्या आत प्रस्ताव प्राप्त करून मान्यता देण्याची कार्यवाही करावी असे आदेश शिक्षणाधिकारी यांना २३ डिसेंबरला दिल्यानंतर रात्री उशिरा उपोषण स्थगित करण्यात आले. १५ दिवसात शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशानुसार कार्यवाही न झाल्यास १६ व्या दिवशी पूर्ववत आंदोलन सुरू राहील, असा इशारा तक्रार निवारण समितीचे अजय भोयर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधींना उपोषणस्थळी दिला.उपोषण मंडपाला जिल्हा परिषद सदस्य मनोज चांदुरकर, नाना ढगे, विलास कांबळे, समीर देशमुख, सतीश राऊत, रमेश टपाले, मनोहर वाके, पुंडलिक नागतोडे, रवी कोठेकर, नरेंद्र थुटे, विजय चौधरी, संजय बारी, रहिम शाह, इंद्रजीत ढोले, पुंडलिक राठोड, सुनील गायकवाड, गिरीश वानखेडे, साबळे, अजय कोल्हे, सतीश जगताप, यांच्यासह अनेकांनी पाठिबा दिला असून सर्वांचे कारवाईकडे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)