शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर व्यसनाधीन ‘राणी’ने सोडली दारू

By admin | Updated: June 17, 2017 00:57 IST

आयुष्य जसे बिघडू शकते तसे ते सुधारूही शकते. त्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. राणी नावाच्या

दररोज प्यायची एक लिटर मद्य : बोरगाव (हा.) येथील घटना, करुणाश्रमात झाले उपचार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आयुष्य जसे बिघडू शकते तसे ते सुधारूही शकते. त्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. राणी नावाच्या माकडिणीसाठी हे सूत्र लागू झाले आहे. कौस्तुभ गावंडे यांच्यासारख्या पशुप्रेमीने तिच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. दररोज एक लिटर दारू पिणारी राणी आता दारूला स्पर्शही करीत नाही. एक माकडीण दारू सोडू शकते तर माणूस का नाही, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील बोरगाव हातला येथील एका मदाऱ्याने माकडीण पाळली होती. दिवसभर तो खेळ करायचा. स्वत: दिवसभर दारूच्या नशेत राहून राणीलाही दारू पाजायचा. दोन-तीन वर्षांपासून दारू पिणे हा दोघांचाही नित्यक्रम बनला होता. ८-१० महिन्यांपूर्वी वर्धा वन विभागाची नजर या मदारीवर गेली. त्यांनी माकडीणीला ताब्यात घेत वन्यजीव प्रेमी कौस्तुभ गावंडे यांच्याकडे सोपविले. कौस्तुभने पीपल्स फॉर अ‍ॅनिमल या संस्थेच्या करुणाश्रमात माकडिणीला ठेवले. राणीने दोन-तीन दिवस भोजनाला स्पर्शही केला नाही. तिला दारूचे व्यसन लागल्याची माहिती आश्रमवासीयांना कळली. या आश्रमाचे पशुचिकित्सा अधिकारी संदीप जोगी यांना राणीची दारू कशी सोडवायची हा प्रश्न पडला होता. हळूहळू कमी केला डोज कौस्तुभ आणि डॉ. जोगी यांनी राणीची दारू एकदम न सोडता तिचे प्रमाण हळूहळू कमी केले. सहा महिन्यांत दारू कमी कमी करीत पूर्णपणे बंद करण्यात आली. या काळात डॉक्टरांची तिच्या हालचालीवर पूर्ण नजर असायची. करुणाश्रमात राणीची राजा नावाच्या माकडाशी ओळख झाली. तिला आता पिलूही झाले आहे. हे पिलू थोडे मोठे झाल्यानंतर त्याला रामटेकच्या जंगलात सोडले जाईल,असे कौस्तुभ यांनी सांगितले.