शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:14 IST

जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, केळी, हळद व भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शिवाय शेतात ढिग करून ठेवले तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ठळक मुद्देनुकसान भरपाईची मागणी : तूर, हरभरा, भाजीपाला, संत्रा, गव्हाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा गहू, हरभरा, कापूस, तूर, संत्रा, केळी, हळद व भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. शिवाय शेतात ढिग करून ठेवले तूर पीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची बऱ्यापैकी नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.आर्वीसह तालुक्यातील जळगाव, शिरपूर (बोके) वर्धमनेरी, टाकरखेडा, परतोडा, टोणा, देऊरवाडा, राजापूर, सर्कसपूर, वाढोडा, निंबोली (शेंडे), अंबिकापूर, खुबगाव, दहेगाव (मु.), पिंपळखुटा, चिंचोली (डांगे), गुंमगाव, रोहणा, हरदोली, वडगाव (पांडे), नांदोरा, विरूळ (आकाजी) या गावात वादळीवाºयासह मुसळधार पाऊस झाला.यामुळे तूर, गहू व चना पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शिवाय काही शेतकऱ्यांनी सवंगणी करून शेतातच ढिग करून ठेवलेली तूर आली झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारंजा तालुक्यातील काजळी, राहटी, जोगा, नागाझरी, धानोली, मेटहिरजी, कन्नमवारग्राम, आजनडोह येथे वादळी पावसासह गारपीट झाले. यामुळे शेतातील उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. वादळीवाऱ्यामुळे गहू पीक मोडून लोळण घेत असल्याचे दिसून येते.शिवाय संत्रा, चना व तूर पिकालाही पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. सेलू तालुक्यात केळझर, घोराड, आकोलीसह विविध गावांना पावसाचा तडाखा बसला. केळझर येथे गुरुवारी रात्री सुमारे १० वाजता मेघगर्जनेसह झालेल्या पाऊस व गारपीटानंतर आज पहाटे ६ वाजता पुन्हा एकदा पाऊस झाला. या वादळी पावसामुळे अनेकांच्या शेतातील गहू, जमीनदोस्त झाला असून हरभऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतातील कपाशीच्या झाडांवरील बोंडामधील कापूस गळून पडत ओला झाल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. वादळीवाऱ्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा रात्री खंडीत झाला होता. तो आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. वायगाव (निपानी), कानगाव, सेलगाव लवणे, समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी संवगणी केलेला हरभरा व तूर शेतातच ढिग करून ठेवले होते. पण, अचानक आलेल्या पावसामुळे ते भिजल्या गेले. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंजी (मो.) येथील शेतकरी बाळा घुमडे यांच्या शेतातील ऊस पिकाचे बऱ्यापैकी नुकसान झाले. अशीच परिस्थिती या भागातील इतर शेतकऱ्यांवर ओढावली आहे. रोहणा परिसरात झालेल्या पावसामुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, भाजीपाला वर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला. अवकाळी पावसाचा घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभरा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. तर ओलिताच्या शेतात झाडाला असलेला कापूस भिजल्याने कपाशी उत्पादकाच्या अडचणीत भर पडली आहे. आष्टी तालुक्यातील माणिकवाडा, तारासावंगा, वडाळा, वर्धपूर या भागात भाजीपाला, संत्रा तर घाडी, साहूर भागात मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक गावात झाडे पडल्याने वीज सेवा खंडीत झाली. याचा परिणाम मोबाईल सेवेवर झाला होता. बीएसएनएलची केबल तुटल्याने कार्यालयातील सेवा ठप्प झाली होती. काही ठिकाणी घरावरील टिनपत्रे उडाले. नुकसानग्रस्त भागात सर्व्हेक्षण करण्याचे आदेश तहसीलदार आशीष वानखेडे यांनी तलाठ्यांना दिले आहे.बाजारपेठेतील शेतकºयांची तूर भिजलीआर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेल्या तुरीला अकाली पावसाचा मोठा फटका बसला. मात्र व्यापाºयांची तुर सुरक्षित राहिली. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाल्याचे आरोप मनीष उभाट यांनी केला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस