शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारातूनही बोंडअळी निर्मूलनावर सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:22 IST

गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, ......

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत बैठक : लहान शेतकरी केंद्रस्थानी ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, आठवडी बाजाराच्या दिवशी सामान्य शेतकऱ्यांना दवंडी देवून त्यांच्याच बोलीभाषेत बोंडअळी निर्मूलनाबाबतची माहिती पोहचवा असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिले आहे.या कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संघटना, ग्रामपंचायती यांचीही मदत घ्या,अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद कृषी विभागाने जनजागृती रथ तयार केला आहे. त्या रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचारासाठी रवाना करण्यात आले. जिल्हा परिषदेत मंगळवारी या संदर्भात बैठक घेण्यात आली होती. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, अश्विनी भोपळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कापसे, विशेष घटक योजनेचे कृषी अधिकारी धर्माधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी नियोजन हाती घेतले आहे. बोंडअळी नियंत्रणाकरिता कपाशीची लागवड होताच, पाने, फुले व बोंड लागण्यास सुरूवात होताच बोंडअळीची अंडी इतर बाबीची पाहणी सुरू करून अळींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पातळीवर आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत तपशीलवार माहिती, उपसंचालक कापसे यांनी दिली. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आवश्यक असणारे सर्व फेरोगेन सापळे व किटकनाशके आवश्यक त्या प्रमाणात महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाच्या तालुका वितरकांकडे व कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जन जनजागृती विविध माध्यमातून केली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही विभागाच्या पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यास जबाबदारी सोपवून त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी नियोजनानुसार अहवाल दररोज द्यावा अशी सूचना करण्यात आली.कपाशीच्या बाजूला भेंडी, अंबाडी लावाबी.टी. कपाशीच्या सभोवताल नॉन बी.टी. कपाशीच्या आश्रित ओळी लावणे, पिकांसभोवताल कपाशीच्या कुळातील भेंडी, अंबाडी ही सापळा पिके लावणे, कपाशीला पाने, फुले व बोंड लागण्यास सुरूवात होण्यापूर्वीच शेंदरी बोंडअळीची अंडी व छिद्रे यांची नियमित पाहणी करणे, अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळीसारखी दिसणारी फुले तोडून नष्ट करणे, पिकामध्ये हेक्टरी २ फेरोगोन सापळे लावावे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी