शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात रुग्ण संख्या मर्यादित ठेवण्यात प्रशासनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:19 IST

वर्धा जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.

ठळक मुद्देराज्यभरातून सर्वात कमी रुग्ण वर्ध्यातचप्रभावी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात मे महिन्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला. तरीही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने प्रभावी अंमलबजावणी करुन कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात मोठे यश मिळविले आहे. जिल्ह्यात एकूण १३ रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तेही लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे सांगण्यात आले असून सर्वात कमी रुग्ण असलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे.एका महिलेचा मृत्यू पश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. त्यानंतर बाहेर जिल्ह्यातून वर्ध्यात राहायला किंवा उपचाराकरिता आलेल्या व्यक्तींमुळे रुग्णसंख्या ही २६ वर पोहोचली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील १३ तर बाहेर जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये जिल्ह्यातील २ आणि बाहेर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. बाहेर जिल्ह्यातील सर्व रुग्ण बरे होवून आपापल्या गावी रवाना करण्यात आले. तर वर्ध्यातील ५ रुग्णांवर सध्या उपचार सुरुआहे. यामध्ये चौघांवर वर्ध्यात तर एकावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. आताही रुग्ण संख्या वाढू नयेत यासाठी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे. आलेल्यांना क्वारंटाईन करणे, त्याची माहिती घेणे यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका दिवसरात्र कार्यरत आहे.

शिथिलता अन् उपायोजनाहीलॉकडाऊनंतरच्या शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्यात जनजीवन पूर्वपदावर आले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या सीमा बंद असून अंतरजिल्ह्यात दुकाने, उद्योग सुरु केले आहेत. प्रत्येक भागामध्ये नोडल अधिकारी, प्रशासन लक्ष देवून सोशल डिस्टन्सिंगसह इतरही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देवून आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरची व्यवस्था न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने प्रारंभापासूनच प्रभावी अंमलबजावणी केल्याने वर्ध्यातील उपायोजनांची देशपातळीवर दखल घेतल्या गेली. याच उपाययोजनेमुळे कोरोनाच्या लढ्यातही वर्धा महाराष्ट्रात अव्वल राहिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या