शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गुप्तधनासाठी पायाळू मुले व पायवर मुलींचा शोध घेणारी टोळी सक्रीय; वर्ध्यातील पालक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 18:25 IST

Wardha News गुप्तधनाच्या आमिषाने मुलांचा बळी देणारा मांत्रिक व त्याच्या सहकाऱ्यांची टोळी वर्धा शहरात सक्रिय झाल्याचे एका प्रकरणातून पुढे आले आहे.

ठळक मुद्देमांत्रिकाला अटक करावी, अंनिसची रामनगर ठाण्यात तक्रार

वर्धा : जमिनीत दडलेले गुप्तधन शोधण्यासाठी पायवर असलेल्या मुलामुलींना शोधून त्यांना विविध प्रलोभन, खाद्यपदार्थांत गुंगीचे औषध देऊन, पैशाचे आमिष दाखवून पळवून नेत गुप्तधनाच्या आमिषाने त्यांचा बळी देणारा मांत्रिक व त्याच्या सहकाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय झाल्याचे एका प्रकरणातून पुढे आले आहे. त्यामुळे त्या मांत्रिकाचा शोध घेत त्याला अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारीतून केली आहे.

महेश (नाव बदलेले) हा घराजवळील महाविद्यालयात बी.फार्म. दुस-या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचा मोबाईल क्रमांक त्याच्या मित्राकडून नरेश तेलरांधे याच्या सांगण्यावरून त्याच्या मुलाने मिळविला आणि गांधी मेमोरियल लेप्रोसी फाऊंडेशनमध्ये राहणाऱ्या मित्राला सोबत घेत ६ रोजी महेश राहत असलेल्या घराजवळ जाऊन त्याला फोन करून बाहेर बोलाविले. त्याच्याशी जवळीक साधून तू पायवर आहे, तुझ्यामुळे गुप्तधन मिळू शकते, तुला स्वप्नात असे धन दिसते का, गुप्तधन लपलेले आहे, असा भास होतो का तू आम्हाला मदत कर, आमच्यासोबत चल तुला पैसे देवू. आमच्या संपर्कात दिल्ली, मुंबई येथील खूप व्यक्ती संपर्कात आहे, असे सांगितले. मात्र, महेशला काहीच न समजल्याने तेथून घरी निघून गेला. ही बाब त्याने त्याच्या आईला सांगितली. मुलाची आई घाबरल्याने तिने तत्काळ गजेंद्र सुरकार यांना ही बाब सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत रामनगर ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुप्तधनाची अशी असते प्रक्रिया

आजही समाजात गुप्तधन मिळविण्याची लालसा आहे. यातूनच मुला, मुलींची पूजा करून त्यांचा नरबळी दिला जाताे. या प्रकरणात मांत्रिक हा प्रमुख असतो. तो सतत गुप्तधनाची लालसा असणाऱ्या व्यक्तीला शोधून त्याला आपल्या जाळ्यात अडकवितो. त्याला हे पटवून देतो तुझ्या नशिबात गुप्तधन आहे. त्यासाठी पायाळू मुलगा किंवा वयात न आलेली पायवर मुलगी यांची शोधाशोध सुरू होते. त्यांचे अपहरण करुन आमिष दाखवून गुप्तधनाच्या जागी आणल्या जाते. तेथे या मुलामुलींची पूजा करून त्या जागेचीही पूजा केली जाते व नंतर यांचा बळी देवून रक्त नियोजित जागेवर टाकून मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी