शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वर्धा जिल्ह्यातील आमदारांच्या मते विकासाची प्रक्रिया होणार गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्धा जिल्ह्यातूनही अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.जनादेशाचा आदर केला - रामदास तडसविधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीला जनतेने जनादेश दिला होता. शिवसेनेकडून याचा अनादर झाला. मात्र जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार विराजमान झाले आहे. हे सरकार जनतेच्या सर्व आकांक्षा पूर्ण करतील व विकासाकडे वेगाने वाटचाल होईल. देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाल्याने राज्यातील विकासाची प्रक्रिया गतीमान होण्यास मदत होणार आहे व हीच जनतेचीही इच्छा होती. अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला आहे.जनतेची इच्छा पूर्ण झाली - समीर कुणावारमहाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना-रिपाई महायुतीला जनादेश दिला होता यात भारतीय जनता पक्ष १०५ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष होता. राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे. अशी सर्व जनतेची इच्छा होती. मात्र शिवसेना पुवीर्पासूनच सरकारच्या सरकार स्थापनेत विरोधकाची भूमिका घेऊन होती. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. हे सरकार निश्चितपणे विश्वासमत पारित करेल व महाराष्ट्राची पुन्हा विकासाकडे वाटचाल सुरू होईल. अशी प्रतिक्रिया हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे.सत्तेचा दुरूपयोग करून सरकार स्थापन- अ‍ॅड.. चारूलता टोकसराज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट रातोरात हटवून राज भवनातून सत्ता स्थापनेचे काम भाजपने केले. हा सारा प्रकाश कळण्याच्या पलीकडला आहे. व तो योग्यही नाही. अजित पवार यांच्यावर कुठला दबाव होता. हे तेच सांगू शकतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची बोलणी सुरू असताना ही घटना घडली.अशी प्रतिक्रीया काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष  चारूलता टोकस यांनी दिली आहे.विकासाची प्रक्रिया वेगवान होईल. - डॉ. पंकज भोयर, आमदारजनतेला सरकार स्थापनेची बऱ्याच दिवसापासून प्रतिक्षा होती. शनिवारी ब्रम्ह मुहूर्तावर ही प्रतिक्षा संपली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार राज्यात सत्तारूढ झाले. भाजपला १०५ जागा देवून जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. सरकार स्थापनेनंतर आता विकासाची घोडदौड अशीच सुरू राहील.

 

 

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस