शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चटोपाध्याय आयोगानुसार निवडश्रेणी निश्चित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:12 IST

महाराष्ट्र शासनाच्या सेवायोजन विभागाच्या २ सप्टेंबर १९८९ व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या ११ फेब्रुवारी १९९१ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी १९८६ पासून चटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतनश्रेणी अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांची २४ वर्षे सलग सेवा झाली असल्यास त्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून निवडश्रेणी मंजूर करावयाची आहे.

ठळक मुद्देसचिन आेंबासे : झेडपीत मूल्यमापन समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सेवायोजन विभागाच्या २ सप्टेंबर १९८९ व महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या ११ फेब्रुवारी १९९१ च्या शासन निर्णयानुसार १ जानेवारी १९८६ पासून चटोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतनश्रेणी अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांची २४ वर्षे सलग सेवा झाली असल्यास त्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून निवडश्रेणी मंजूर करावयाची आहे. प्रत्यक्ष आर्थिक लाभ १ एप्रिल २००४ पासून द्यावयाचा असल्याने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन आेंबासे यांच्या कक्षात निवडश्रेणी मुल्यमापन समितीची सभा घेण्यात आली.या सभेत समितीपुढे सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याच्या अनुशंगाने सन १९९२ पर्यंत १ हजार ९५० सेवानिवृत्त सहायक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी ठेवण्यात आली होती. या यादीमधुनच शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार निवडश्रेणीकरिता पात्र शिक्षकांची निश्चिती करावयाची आहे. याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित शासन निर्णयाचे अवलोकन करुन खात्री करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सेवानिवृत्त सहायक शिक्षकांची यादी प्रसिद्धीक रिता पाठविण्यात आली आहे. या यादीतील नावे असलेल्या सेवानिृत्त वेतनधारकांनी यादीत दर्शविलेली महिती योग्य व अचूक असल्याची खात्री करुन कुणाचे आक्षेप व हरकती असल्यास वैयक्तिक लेखी निवेदन गट विकास अधिकारी किंवा गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस. बी. शेळके, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सिद्धार्थ मेश्राम, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मिक इंगोले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अशोक पवार, आर.व्ही. कोपरे, मनिष कांबळे, वरिष्ठ सहायक सुधीर कांबळे कनिष्ठ सहायक यांची उपस्थित होते.१५ दिवसात आक्षेप नोंदविण्याचे आवाहनयादी निदर्शनास आणून दिल्यानंतर आक्षेपासह पोच पावत्या यादी प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत सादर करणे अपेक्षित आहे. सेवानिवृत्त शिक्षकांपैकी जे सेवानिवृत्त शिक्षक हयात नाहीत अशा शिक्षकांचे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिकडून पोच पावत्या सादर कराव्या.प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील प्रत्येक सेवानिवृत्त वेतनधारकांनी पेन्शन घेत असलेल्या पंचायत समितीच्या संबंधित विभागात जाऊन पोच पावती देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय पुढील पेंशन अदा करता येणार नाही, असेही सूचित करण्यात आले आहे.विहित मुदतीत आक्षेप व हरकती कार्यालयास प्राप्त न झाल्यास यादीवर कुणाचाही आक्षेप नाही, असे गृहीत धरुन निवडश्रेणी मंजुरीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद