शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

अपघात वाढले; जिल्ह्यात हेल्मेटसक्ती तीव्र करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : २०१८ मध्ये ५२९ अपघातात २१३ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या ५२९ रस्ते अपघातात २१३ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यत: डोक्याला इजा झाल्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे.  रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करा, हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार  यांनी दिलेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक राज्याने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.  त्या अनुषंगाने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात २०१८ या वर्षात एकूण ५२९ अपघात झालेत. त्यामध्ये १९८ अपघातात २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.  १०५ अपघातात २५१ लोकांना गंभीर दुखापत झाली असून १८६ मध्यम अपघातात २७५ लोकांना दुखापत झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण ३८२ अपघात झाले असून १४९ लोकांचा मृत्यू झाला. ३७३ गंभीर जखमी झाले आहेत. बैठकीमध्ये दरवर्षी होणाºया रस्ते अपघातामधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली.  दुचाकीस्वारांना  हेल्मेट वापरणे बंधनकारक करावे, गाडी चालविताना  मोबाईल वापरणे, दारू पिऊन गाडी चालविणे, अति वेगाने वाहन चालविणे आणि सीट बेल्टचा वापर न करणाºया वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. याशिवाय जिल्ह्यात संभाव्य अपघातस्थळे ठरवण्यासाठी पाहणी करावी.  जिल्ह्यातील ३९ अपघात स्थळांवर काय उपाययोजना केल्यात, यासंदर्भातील अहवाल  सादर करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्यात. परिवहन विभागामार्फत वाहन चालविताना मोबाईल वापरणे - ५०० रुपये दंड व परवाना रद्द,  दारू पिऊन गाडी चालविणे- २ हजार रुपये दंड व परवाना रद्द, हेल्मेट न वापरणे - ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, असे सांगितले.या वर्षात ४९३ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३८ दोषी आढळून आले असून ८७ केसेसमध्ये  १ लाख ३३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. बैठकीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (यवतमाळ) कार्यकारी अभियंता, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सी.आर. हसबनीस, डी. आर. चांदोरे, सहाय्यक अभियंता एस.डब्ल्यू. टाके, सुरेश हजारे, अनिल नांदे, भरत कºहाडे मुख्याधिकारी प्रदीप जगताप, पोलिस निरीक्षक अशोक चौधरी, विजय तिराणकर उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस