शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मेटॅडोअरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:50 IST

येथील यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासाठी मेटाडोअरमध्ये मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेवून जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरासमोर त्या मेटाडोअरला धडक दिली.

ठळक मुद्देएक ठार : ३ गंभीर; कोटंबा पाटीजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : येथील यशवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी केळझर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरासाठी मेटाडोअरमध्ये मंडप व स्वयंपाकाचे साहित्य घेवून जात होते. दरम्यान, विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरासमोर त्या मेटाडोअरला धडक दिली. यात विशाल केदार वानखेडे (२२) या बीए भाग २ मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या वाहनात असलेले अन्य तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातात विद्यार्थ्यांसह ट्रकचा चालक व क्लिनरही गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरूवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वर्धा-नागपूर महामार्गावर कोंटबा थांब्याजवळ घडला.यशवंत महाविद्यालयाचे रासेयो शिबिर केळझर येथे आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी उद्घाटनाचा कार्यक्रम असल्याने गुरूवारी मंडप व स्वयंपाकाचे साहित्य मेटाडोअर घेवून एमएच ३२ क्यू १८३२ क्रमांकाच्या मिनिडोअरमध्ये ७ ते ८ विद्यार्थी बसून जात होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने लोहागिट्टी भरून आलेल्या एमएच ४० एके ३०१३ क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात मेटाडोअरमधील शुभम झाडे (रेहकी), स्वप्नील भांगे (बोरी), सागर हलगे सालई (पेवठा) हे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यातील सागर हलगे हा महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. मेटाडोअर चालक वैभव उमाटे अपघातानंतर पळून गेला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.शिबिराकरिता ३९ विद्यार्थ्यांची झाली होती निवडरासेयो शिबिरासाठी २८ विद्यार्थिनी व ११ विद्यार्थी वेगवेगळ्या आॅटोतून जात होते. यातीलच ७ ते ८ विद्यार्थी मेटाडोअरमध्ये सामानासह बसून जात होते. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मातीकाम सुरू असलेल्या भागात जाऊन ट्रक पलटला. या ट्रकला लटकून अपघातग्रस्त मेटाडोअरमधील एक विद्यार्थी फरफटत गेल्याचे उपस्थितांनी सांगितले.सुमोला कारची धडक; चार जखमीवर्धा - अमरावती येथील विशाल शंकर रंगारी (२६) हे एमएच २७ एसी ८९६५ क्रमांकाच्या सुमो गाडीत प्रवासी घेऊन पुलगाव येथे आले होते. पंचधारा मार्गावर त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने आलेल्या एमएच ३५ पी ०७५१ क्रमांकाच्या कारने धडक दिली. या अपघातात सुमोत असलेल्या प्रवाशांसह कारमधील प्रवासी व चालक असे चौघे जखमी झाले आहे. विशाल रंगारीच्या तक्रारीवरुन कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघात