आॅनलाईन लोकमतआकोली : परिवहन महामंडळाच्या भंगार बसचे इरसाल किस्से संपता संपत नाही. अशाच भंगार बसला स्टेअरिंग फ्री झाल्याने पुलगाव आगाराच्या बसला पुलई येथील पुलाजवळ अपघात झाला. यात प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ११ वाजता घडला. सुदैवाने जीवहानी टळली.पुलगाव आगाराची बस क्र. एमएच ४० एन ८४९५ ही पुलगाव-आंजी (मोठी) आंजीकडून विरूळ मार्गे पुलगाव जात होते. दरम्यान, पुलई नजीकच्या पुलाजवळ स्टेअरिंगमध्ये अचानक बिघाड झाला. स्टेअरिंग फ्री झाल्याने बस रस्त्याच्या कडेला नाल्यात जाऊन अडकली. यात चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. आंजीचे जमादार ओमप्रकाश इंगोले, दिनेश गायकवाड, अमर हजारे यांनी धाव घेत मदत केली. जखमींवर आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केले.मोठा अपघात टळलाबस नाल्यात अडकली नसती तर ती थेट पुलात जाऊन जीवहानी झाली असती; पण सुदैवाने बस अडकली व प्रवाशांसह वाहक, चालकांचे प्राण बचावले.दुचाकींची समोरासमोर धडक, चार गंभीरसमुद्रपूर - दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी गिरड ते साखरा मार्गावर घडला. दुचाकी क्र. एमएच ४० एपी ९७६३ ने नत्थू भाऊराव उइके रा. वाटरवाणी जि. नागपूर व कवडू महादेव वलके रा. मेळा हे साखरा येथून गिरडकडे जात होते तर डोमा पुंडलिक खेडकर (२९) व सुरेंद्र सिद्धार्थ खेडेकर (२७) रा. साखरा गावाकडे जात होते. दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने चौघेही गंभीर जखमी झाले. जखमींना समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघाताची गिरड पोलिसांनी नोंद घेतली.
स्टेअरिंग फ्री झाल्याने बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:21 IST
परिवहन महामंडळाच्या भंगार बसचे इरसाल किस्से संपता संपत नाही.
स्टेअरिंग फ्री झाल्याने बसला अपघात
ठळक मुद्देप्रवासी किरकोळ जखमी