लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : लगतच्या नाचणगाव व गुंजखेडा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता एकत्र पाणीपुरवठा योजना आहे. वर्धा नदीपात्रातून या गावांना पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही गावांना पाणी टंचाईची झळ बसत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या योजनेची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही तेथे गाळ साचलेला आहेत तसेच पुलगावच्या नाल्याचेही पाणी त्यात शिरत असल्याचे निदर्शनास आले.वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. नदीत पंपहाऊसला ज्या ठिकाणावरून पाणी येते तेथे वाळू उपस्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाल्याने गाळ साचला आहे. तसेच पुलगाव येथील नाल्याचे पाणी या नदीत येत असल्याने जलशुद्धीकरण होण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी नदीला मुबलक पाणी असूनही गावरकऱ्यांच्या घश्याला कोरड पडलेली आहे. यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गोनाडे यांनी पाण्याच्या जलशुद्धीकरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.२० वर्षांपासून रेती बदलविलीच नाहीजलशुद्धीकरण केंद्रात तुरटी, ब्लिचिंग यासोबत रेतीची आवश्यकता असते. ही रेती वापरायच्या अगोदर संबंधित विभागामार्फत प्रामाणिक केल्या जाते. परंतु, गुंजखेडा येथील या जलशुद्धीकरण केंद्राची रेती गेल्या वीस वर्षांपासून बदलविलेली नाही. खराब झालेली रेती बाहेर काढल्याने रेतीसाठी कमी झाला आहे. याचा परिणाम जलशुद्धीकरणावर होतो. तरी त्वरीत नवीन प्रमाणित रेती जलशुद्धीकरण केंद्रावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.जलशुद्धीकरण केंद्रावर असणाऱ्या समस्यांसंदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांच्याशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या पाण्याची समस्या त्वरीत निकाली लाढण्याची मागणी केली आहे.- प्रवीण साखरकर, जि.प.सदस्य, नाचनगाव
नदीला मुबलक पाणी, तरी ग्रामस्थ तहानलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST
वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली.
नदीला मुबलक पाणी, तरी ग्रामस्थ तहानलेले
ठळक मुद्देदेखभाल दुरुस्तीचा अभाव : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या भेटीत धक्कादायक वास्तव उघड