लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रतिष्ठित व्यापारी समजल्या जाणाऱ्या कृपलानी बंधूच्या अवैधबांधकामामळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कृपलानीच्या या अवैध साम्राज्याला स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे प्रचंड मोठे अभय असल्याचे दिसून येत आहे.शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक मार्गावर अवैधरित्या कृपलानीने हॉटेल बांधकाम सुरू केले आहे. याचीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही. महावितरणने येथे अवैधरित्या वीजपुरवठा दिला आहे, तो खंडीत करण्याबाबत तक्रार केल्यानंतरही महावितरणाने या प्रकरणात कारवाई केलेली नाही. शिवाजी चौक मुख्य मार्गावर राधिका हॉटेलसमोरील नाल्यालगतचे रहिवासी दिलीप जैन यांच्या नावावर असलेली जागा हडपण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाची मदत घेऊन त्यांनी डाव रचला आहे. याबाबत दिलीप जैन यांनी नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय यांच्याकडे तक्रारी केल्या. शासकीय नालाही हडपण्यासाठी प्रयत्न कृपलानीने सुरू केले आहे. वर्धा पोलीस ठाण्यासमोर टायरचे दुकान कृपलानीने अवैध बांधकाम करून उभारलेले आहे.सदर दुकानाच्या बाजूला सार्वजनिक नाला व बाजूला पोलीस क्वार्टर आहे. या नाल्यात बांधकाम झाल्याने पाणी अडवून ते पोलीस क्वार्टरमध्ये शिरते याबाबत पोलीस प्रशासनाने नगर पालिकेकडे तक्रारी केल्या, परंतु पालिका कृपलानी बंधूंना अभय दिल्याचे दिसून येत आहे. सिंधी मार्केटमधील दुकानासाठी नाल्यावर इमारत उभी केल्याने पोलीस क्वार्टरमध्ये सांडपाणी जाते. राष्टÑभाषा प्रचार समितीसमोर सानेवाडी परिसरात बहुमजली फ्लॅट स्कीम कृपलानी बंधूने बांधली आहे.नगर परिषद व शासनाच्या नियमांना डावलून ही इमारत उभी करण्यात आली आहे, असा या भागातील नागरिकांचा आरोप आहे. कृपलानीच्या अनेक अवैध बांधकामाविषयी तक्रारी करण्यात आल्या परंतु या लक्ष्मी दर्शनामुळे जिल्हा प्रशासन व नगर परिषद प्रशासन कारवाई करीत नाही. प्रशासन आपल्या खिशात असल्याचा दावा कृपलानी सार्वजनिक ठिकाणी करीत आहे यांचा अर्थ प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशयाची सुई फिरत आहे.
कृपलानीच्या अनेक अवैध बांधकामाला अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:28 IST
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी समजल्या जाणाऱ्या कृपलानी बंधूच्या अवैध बांधकामामळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलिसांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कृपलानीच्या या अवैध साम्राज्याला स्थानिक नगर पालिका प्रशासनाचे प्रचंड मोठे अभय असल्याचे दिसून येत आहे.
कृपलानीच्या अनेक अवैध बांधकामाला अभय
ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : अतिक्रमण केल्याने पोलीस क्वार्टर अडचणीत