शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वर्ध्यात शेत शिवारात एन्ट्री केलेल्या बिबट्याने घेतला अखेरचा श्वास

By महेश सायखेडे | Updated: August 6, 2023 16:50 IST

बिबट्याने नागरिकांच्या समक्षच अखेरचा श्वास घेतल्याने वनविभागाचे टेन्शन वाढले आहे.

वर्धा : आर्वी तालुक्यातील खरांगणा (मो.) नजीकच्या दिघी मौज्यातील पानवाडी शेत शिवारात कपाशीच्या पिकात सुमारे अडीच वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच रविवारी नटाळा शेत शिवारात एन्ट्री केलेल्या सुमारे एक वर्ष वयोगटातील मादी बिबट्याने नागरिकांच्या समक्षच अखेरचा श्वास घेतल्याने वनविभागाचे टेन्शन वाढले आहे. या दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूचे ठोस कारण अद्यापही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना गवसले नसले तरी नागरिकांकडून अनेक तर्क लावले जात आहेत.

खरांगणा (मो.) पासून जवळच असलेल्या नटाळा शेत शिवारात दुर्योधन देशभ्रतार यांच्या शेतात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खरांगणा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काही वन्यजीव प्रेमींना सोबत घेत घटनास्थळ गाठले. बारकाईने पाहणी केली असता संबंधित बिबट्या खेकारत असल्याचे आणि त्याची प्रकृती अस्वस्त असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लक्षात आले. लागलीत बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू चमूही घटनास्थळी दाखल झाली. प्रकृती अस्वस्त असलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत असतानाच संबंधित मादी बिबट्याने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह खरांगणा येथील वनविभागाच्या रोपवाटीकेत नेत उत्तरिय तपासणी करण्यात आली. संबंधित बिबट्याला टिक फिव्हर किंवा विषबाधा तर झाली नाही आदी विषयाची अधिकची माहिती मृत मादी बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालाअंती पुढे येणार आहे.घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी

शेत शिवारात बिबट्या असल्याची माहिती नटाळा परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांनी गर्दी बाजूला सारून मादी बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. अशातच बिबट्याने अखेरचा श्वास घेतला.

टॅग्स :wardha-acवर्धा