शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

बारावीच्या पेपर दिवशीच कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू, विरूळ परिसरतील घटना

By रवींद्र चांदेकर | Updated: February 29, 2024 11:52 IST

परिसरातील सालफळ येथील कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अरविंद चेतन कोहळे (वय ५५) आणि चेतन अरविंद कोहळे (१८) अशी मृत बापलेकांची नावे आहे.

विरूळ आकाजी (वर्धा) : परिसरातील सालफळ येथील कॅनालमध्ये बुडून बापलेकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. अरविंद चेतन कोहळे (वय ५५) आणि चेतन अरविंद कोहळे (१८) अशी मृत बापलेकांची नावे आहे. हे दोघे बापलेक बुधवारी कॅनालजवळील शेतात ओलित करीत होते. ओलीत संपल्यावर मुलगा चेतन हा पाय धुण्यासाठी कॅनालवर गेला व पाय घसरून कॅनालमध्ये पडला. त्याला वाचविण्यासाठी वडील अरविंद कोहळे हे गेले असता दोघही बापलेक पाण्यात बुडाले.

या घटनेत दोघाही बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत बापलेक घरी न आल्याने गावातील पन्नास ते साठ लोक शेताच्या रस्त्याने निघाले होते.  त्यांना बैल एकटेच येताना दिसले.  नंतर शेताजवळ जाऊन पाहता तर त्या दोघांच्याही चपला कॅनलजवळ दिसल्या. गावकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी धाव घेतल. दोघाही बापलेकाचा शोध सुरू झाला.  रात्री ११:०० वाजता वडीलांचा मृतदेह सापडला, तर गुरुवारी पहाटे ६:०० वाजताच्या सुमारास मुलगा चेतन याचा मृतदेह सापडला.

याबात पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुलगाव येथे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले. यात चेतनचा गुरुवारी बारावीचा पेपर होता. या दुर्देवी घटनेने विरूळ परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे. पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे.