शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2022 13:15 IST

पिलापूर येथील शेतकरी सुभराव महादेव बास्कवरे (४२)  हे पिलापूर तलावामध्ये मासोळी पकडण्याकरिता गेले असता, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

आष्टी(शहीद) ( वर्धा ):

पिलापूर येथील शेतकरी सुभराव महादेव बास्कवरे (४२)  हे पिलापूर तलावामध्ये मासोळी पकडण्याकरिता गेले असता, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना  ती दिवसापूर्वी  घडली असून आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्याने घटनेचा उलगडा झाला.

शेतकरी सुभराव हे गावाजवळून दोन किमी अंतरावर असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या पिलापूर तलावावर मासोळी पकडण्यासाठी गेला होता. मासोळी पकडल्यावर सायंकाळी घरी परत येत असताना अचानक पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये शुभराव जागीच ठार झाला.

गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असल्यामुळे त्याचे कुटुंब शोध घेत होते आज सकाळी परिसरामध्ये गुराख्याला दिसल्याने याची माहिती कुटुंबाला दिली लागलीच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.एस.उईके यांच्यासह क्षेत्रसहाय्यक,वनरक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी उईके यांनी दिली. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी व १५ वर्षाचा मुलगा आहे. त्याच्याकडे तीन एकर शेती आहे.