शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात तब्बल चौदा तुकड्यांत आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2022 18:31 IST

Wardha News समुद्रपूर  तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगल परिसरात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देदुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार

महेश सायखेडे वर्धा : समुद्रपूर  तालुक्यातील कोरा नजीकच्या मौजा पवनगाव झुडपी जंगल परिसरात तब्बल चौदा तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून शासकीय नियमानुसार वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

मौजा पवनगाव भागातील झुडपी जंगल परिसरात कुजल्यागत दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांनी बारकाईने पाहणी केली. त्यावेळी वाघ सदृष्य वन्यप्राण्याच्या मासाचे तुटडे आढळून आले. त्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता संबंधित मासाचे तुकडे वाघाचे असल्याचे पुढे आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कुजलेले व विखुरलेले वाघाच्या मासाचे तब्बल १४ तुकडे एकत्र करून पंचनामा आणि शवविच्छेदनाअंती मासाच्या तुकड्यांची शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावली. यावेळी डॉ. मेघा बनकर, डॉ. सुशील पांडव, डॉ. सचिन खेमलापुरे, समुद्रपूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. व्ही. बोरकर, ए. एस. निनावे, वन्यजीव प्रेमी कौस्तूब गावंडे, मानद वन्यजीव संरक्षक संजय इंगळे तिगावकर आदींची उपस्थिती होती.

शिकारीचा अंदाज?तब्बल १४ तुकड्यांत वाघाचा कुजलेला मृतदेह मिळाल्या प्रकरणी वनविभागाने नोंद घेतली आहे. सहा ते सात दिवसांपूर्वी वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात असून मृत वन्यजीव वाघ की वाघिण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शिवाय मृत वाघाच्या पायाची नखे दिसून आली नाही. तर तोंडाचा मिशीचा भाग जबडयासहीत कापलेल्या अवस्थेत दिसून आल्याने नक्कीच ही शिकार असावी असा अंदाज बाळगून वनविभागाचे अधिकारी आरोपीचा शोध घेत आहेत.

नागपूर विभाग ॲक्शन मोडवर

समुद्रपूर तालुक्यातील ज्या परिसरात वाघाचा मृतदेह तुकड्यांत आणि कुजलेल्या अवस्थेत आढळला त्या परिसरापासून चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अवघ्या काही अंतरावर आहे. शिवाय ही शिकार असावी असा अंदाज वनविभागाला असून वनविभागाचा नागपूर विभाग आता ॲक्शनमोडवर आला असून लवकरच या घटनेतील रहस्य उलगडण्यात येईल, अशा विश्वास वनविभागाच्या वतीने वर्तविला जात आहे.

टॅग्स :Tigerवाघ