शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोराेनायनातील दहा महिन्यांत सापडले 99 डेंग्यू पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्याची माहिती वेळीच जिल्हा हिवताप विभागाला देण्यात आली. त्यानंतर या रुग्णांना वेळीच चांगली आरोग्य सेवा देण्यात आल्याने यंदाच्या वर्षी एकाही डेंग्यू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल ७२ डेंग्यू बाधित आढळले होते. त्यापैकी तीन व्यक्तींचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला होता.

ठळक मुद्देगतवर्षी तिघांचा घेतला बळी : यंदा डेंग्यू मृत्यू रोखण्यात मिळाले यश

    लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी कोरोनाच्या भीतीमुळे अनेक व्यक्तींनी उन्हाळा संपताच आपल्या घरातील कुलर काढून घेतले. तर गाव पातळीवरही विविध किटकजन्य आजारांबाबत आरोग्य यंत्रणेकडून प्रभावी जनजागृती करण्यात आल्याने किटकजन्य आजार अशी ओळख असलेल्या डेंग्यूला रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. असे असले तरी मागील दहा महिन्यांमध्ये जिल्ह्यात एकूण ९९ व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद जिल्हा हिवताप विभागाने घेतली आहे. डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण खासगी किंवा शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्याची माहिती वेळीच जिल्हा हिवताप विभागाला देण्यात आली. त्यानंतर या रुग्णांना वेळीच चांगली आरोग्य सेवा देण्यात आल्याने यंदाच्या वर्षी एकाही डेंग्यू बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात तब्बल ७२ डेंग्यू बाधित आढळले होते. त्यापैकी तीन व्यक्तींचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला होता. तर यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून किटकजन्य आजार आणि कोविड-१९ विषाणूच्या संसर्गापासून नागरिक कसे दूर राहू शकतात याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.या जनजागृती मोहिमेदरम्यान सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींनी दुखणे अंगावर न काढता वेळीच याची माहिती अंगणवाडी सेविकेला देत नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याचे आवाहनही करण्यात आले होते. या मोहिमेला वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

खासगी रुग्णालयही देत डेंग्यू रूग्णांची माहितीडेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टर औषधोपचार करीत असले तरी त्या रुग्णाची माहिती खासगी रुग्णालयांकडून जिल्हा हिवताप विभागाला दिली जाते. त्यानंतर या रुग्णाचे सिरम शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते असल्याचे सांगण्यात आले.

डेंग्यूची लक्षणे अचानक जोराचा ताप येणे. डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे. डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे. स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे. छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे. मळमळणे आणि उलट्या होणे. त्वचेवर व्रण उठणे.

मागील वर्षी जिल्ह्यात डेंग्यूची ७२ रुग्ण आढळली होती. तर तिघांचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला हाेता. तर यंदा डेंग्यूचे ९९ रुग्ण आढळले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत हा आकडा जास्त असला तरी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच डेंग्यू आजाराचे मृत्यू रोखण्यात आम्हाला यश आले आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनासोबतच अन्य आजारांवर लक्ष ठेवून आहे.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.

टॅग्स :dengueडेंग्यू