शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील ८६ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:54 IST

पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपालिकेने बजावली नोटीस : एका घरमालकाकडून इमारत पाडण्याची कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या इमारती राहण्यायोग्य नसल्याने त्यांना पाडण्याची कार्यवाही घरमालकाने करावी, अशा आशयाची नोटीस मालकांना पालिकेच्यावतीने बजावण्यात आली आहे.वर्धा शहरात अशा शिकस्त इमारतींच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात अशा एकूण ७५ इमारती होत्या. यात आता वाढ झाली असून हा आकडा ८६ वर पोहोचला आहे. या इमारत मालकांना पालिकेच्यावतीने नोटीसी बजावण्यात येत असल्या तरी मालकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे या वाढत्या आकड्यांवरून दिसत आहे. गत वर्षी पालिका प्रशासनाकडून या इमारतींच्या मालकांनाही नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. त्याच नोटीसी पुन्हा यंदाच्या सत्रात बजावण्यात आल्या आहेत. या इमारतींचा सर्व्हे सुरूच आहे.या नोटीसींवर अशा इमारत मालकांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. वर्धेत मुख्य बाजारासह, महादेवपुरा, रामनगर, तुकाराम वॉर्ड, गोंड प्लॉट या भागातील अनेक इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्या इमारती पाडण्याची कार्यवाही मालकांनी करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे घरमालकांनी वेळीच याचा विचार करण्याची गरज वर्तविली जात आहे.एका घरमालकाने नोटीसवर केली अंमलबजावणीनगर परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर महादेवपुरा येथील एका घरमालकाने कार्यवाही केल्याचे दिसून आले. येथे एका इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूची इमारत शिकस्त झाली होती. ती इमारत पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली; मात्र भाडेकरूकडून बराच वेळ गोंधळ घालण्यात आला होता.म्हाडाची इमारतही शिकस्तशहरातील लहानुजीनगर परिसरात असलेली म्हाडाची इमारतही शिकस्त झाली आहे. असे असताना या इमारतीत अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.